शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

यवतमाळमध्ये ग्राहकाने स्वत: युक्तिवाद करून जिंकला खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 15:55 IST

तक्रारकर्त्याने न्यायमंचात स्वत: बाजू मांडून प्रकरण जिंकलेही. यवतमाळ ग्राहक न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच असे प्रकरण चालले. मंचाने भारतीय स्टेट बँकेला एक लाख ७५ हजार ८०० रुपयांचा दंड ठोकला.

ठळक मुद्देशैक्षणिक कर्जासाठी तारण ठेवले भारतीय स्टेट बँकेला पावणेदोन लाखांचा दंड

विलास गावंडे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : न्यायाधीशांसमोर वकीलच युक्तिवाद करतो, असा सर्वसाधारण अनुभव आणि प्रथाही आहे. सर्वसामान्य माणूस तक्रारदार या नात्याने स्वत: बाजू मांडतो, हे चित्र अपवादानेच दिसते. तक्रारकर्त्याने न्यायमंचात स्वत: बाजू मांडून प्रकरण जिंकलेही. यवतमाळ ग्राहक न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच असे प्रकरण चालले. मंचाने भारतीय स्टेट बँकेला एक लाख ७५ हजार ८०० रुपयांचा दंड ठोकला.योजनांची माहिती नसल्याने किंवा संस्थेने दिली नसल्याने लोकांची कशी फसगत होते, हेसुद्धा या प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आले आहे. यवतमाळच्या अग्रवाल ले-आऊटमधील किरणराव आनंदराव झामरे यांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी भारतीय स्टेट बँकेच्या धामणगाव रोडस्थित, यवतमाळ शाखेतून तीन लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले. यासाठी झामरे यांची स्थावर मालमत्ता तारण घेतली. वास्तविक चार लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी तारण घेतले जात नाही. ही बाब झामरे यांना पुढे माहीत पडली.अडचण आल्याने प्लॉटची विक्री करायची म्हणून झामरे यांनी बँकेकडे तारण ठेवलेल्या कागदपत्राची मागणी केली. बँकेने यासाठी टाळाटाळ सुरू केली. अडचणींचा डोंगर उभा राहात असल्याने या अन्यायाविरुद्ध किरण झामरे व मंगला झामरे यांनी यवतमाळ ग्राहक न्यायालयात संयुक्त तक्रार दाखल केली. वकील न ठेवता त्यांनी स्वत: हे प्रकरण लढले. किरण झामरे यांनी आपली बाजू स्वत: मंचासमोर मांडली. बँकेचे वकील होते. आपली बाजू कशी खरी आहे, हे झामरे यांनी मंचाला पटवून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून यवतमाळ ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष अ‍ॅड.आश्लेषा दिघाडे व सदस्य रमेशबाबू बी. सिलिवेरी यांनी झामरे यांच्या बाजूने निर्णय दिला.असा आहे निकालआवश्यक नसताना बँकेने शैक्षणिक कर्जापोटी मालमत्तेचे मूळ दस्त गहाण ठेवले. कर्ज परतफेडीच्या हप्त्यापोटी अचूक रक्कम न सांगता इतर खात्यातून रक्कम वळती केली. अनुचित प्रथेचा अवलंब बँकेने केला. प्लॉटचे मूळ कागदपत्र वेळेवर न दिल्याने विक्री सौदा रद्द झाला. त्यामुळे स्टेट बँकेने एक लाख रुपये भरपाई द्यावी. मुलाच्या व झामरे यांच्या पेन्शन खात्यातून काढलेली रक्कम परत करावी, आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासापोटी ५० हजार रुपये व तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला आहे. स्टेट बँकेला एक लाख ७५ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.पेन्शन खात्यातून रक्कम वळतीबँकेने कर्जाचा किती हप्ता भरावा लागतो, याची माहिती झामरे यांना दिली नाही. कर्जाचा हप्ता भरला नसल्याचे कारण सांगत बँकेने किरण झामरे यांच्या पेन्शन खात्यातून नऊ हजार रुपये तर त्यांच्या मुलाच्या खात्यातून ११ हजार ८०० रुपये परस्पर वळते केले होते.कायद्याच्या तरतुदीचा वापरतक्रारकर्त्याला खटला चालविण्यासाठी वकील लावणे आवश्यक नाही. स्वत: युक्तिवाद करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. तशी सूचनाही ग्राहक न्यायालयाने दर्शनी भागात लावली आहे. या तरतुदीचा परिपूर्ण वापर किरण झामरे यांनी केला. एखादी संस्था ही तक्रारकर्त्याची बाजू मांडू शकतो, अशीही तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.