शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

महामार्गांची बांधकामे उपलब्ध मजुरांमध्ये सुरू; गावाकडे निघालेल्या परप्रांतीयांना थांबविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:29 IST

शासनाच्या परवानगीनंतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अन्य सार्वजनिक बांधकामे सुरू झाली. उपलब्ध मजुरांवर ही कामे केली जात आहे. परप्रांतीय मजूर हाच या बांधकामांचा पाया असला तरी आता स्थानिक मजुरांचीही मदत घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देस्थानिकांची मदत घेण्याची तयारी

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या परवानगीनंतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अन्य सार्वजनिक बांधकामे सुरू झाली. उपलब्ध मजुरांवर ही कामे केली जात आहे. परप्रांतीय मजूर हाच या बांधकामांचा पाया असला तरी आता स्थानिक मजुरांचीही मदत घेतली जाणार आहे.लॉकडाऊनमुळे थांबलेली बांधकामे आता पुन्हा सुरू झाली. या बांधकामांवर बहुतांश परप्रांतीय मजूर आहेत. परंतु कोरोना संसर्गाच्या भीतीने बहुतांश मजुरांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. तर काही मजूर कामे सुरू असलेल्या कॅम्पमध्येच थांबले. आता या थांबलेल्या मजुरांच्या मदतीने रस्त्यांची बांधकामे केली जात आहे. आवश्यकतेच्या तुलनेत मजुरांची ही संख्या अर्धी किंवा त्यापेक्षाही कमी आहे. ३ मेनंतर लॉकडाऊनची काय स्थिती राहील यावर परप्रांतीय मजुरांचे कामावर पुन्हा परतणे अवलंबून आहे.

‘शेल्टर होम’मधील मजुरांना बोलविणारगावाकडे निघालेले अनेक परप्रांतीय मजूर अडकून पडल असून ते सध्या शासनाच्या ‘शेल्टर होम’मध्ये आहेत. या मजुरांना रस्ते बांधकामावर बोलविण्याचा प्रयत्न होतो आहे. हाताला काम, रोजच्या खाण्या-पिण्याची, राहण्याची चिंता मिटणार असल्याने अनेक मजूर कामावर येण्यास उत्सूक आहेत. परप्रांतीय मजूर येईपर्यंत स्थानिक मजुरांना घेऊन महामार्ग बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.

ऑपरेटरअभावी मशिन्स आहेत उभ्याबांधकामांवरील जेसीबी, पोकलॅन्ड, क्राँक्रीटीकरणाच्या मशिन्स ऑपरेटर गावाकडे निघून गेल्याने अनेक ठिकाणी उभ्या आहेत. आता स्थानिक पातळीवर पर्यायी ऑपरेटरचा शोध घेतला जात आहे. या बांधकामांवर ट्रान्सपोर्ट, सिमेंट व अन्य साहित्य उपलब्धतेचीही अडचण येत आहे.

सुरक्षेच्या सर्व उपायांचा दावाएकट्या विदर्भात नागपूर-बोरी-तुळजापूर, नागपूर-बुटीबोरी-खापरी, नांदेड-हिंगोली, अकोला-नांदेड, वाशिम-हिंगोली अशा काही महामार्गांची कामे सुरू झाली. तेथे कोरोना सुरक्षेचे सर्व उपाय केले जात असून मास्क, सोशल डिस्टन्सिंगवर भर असल्याचा दावा केला जात आहे.नागपूर-तुळजापूर मार्ग प्रगतीपथावरनागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे महागावपर्यंतचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडे असून वर्धा, यवतमाळपर्यंत ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचे कंपनीकडून सांगितले जाते. महागाव ते वारंगा फाटा हा भाग ‘सद्भाव’ या कंपनीकडे असून तेथे जेमतेम २५ टक्के काम झाले आहे. ‘एनईपी’ या कंपनीकडे वारंगाफाटा ते तुळजापूर हे काम असलेतरी तेथे अद्याप एक टक्काही काम झाले नाही.नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाचे बांधकाम उपलब्ध मजुरांवर सुरू करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन केले जात आहे.- रामअवतार त्यागीएजीएम, दिलीप बिल्डकॉन

टॅग्स :highwayमहामार्ग