शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

बांधकाम विभागाची दीड कोटीची कामे रखडणार

By admin | Updated: March 27, 2015 01:38 IST

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामे निकाली काढण्यासाठी सवयीप्रमाणे बॅक डेटचा आधार घेतला जात आहे.

यवतमाळ : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामे निकाली काढण्यासाठी सवयीप्रमाणे बॅक डेटचा आधार घेतला जात आहे. मात्र यातच मोठी अनियमीतता होत असल्याचा अनुभव असल्याने अर्थ विभागाने प्रस्ताव स्विकृतीस आल्यानंतर दिनांक नोंदविणे सुरू केले. नियमावर बोट ठेऊन कारवाई होत असल्यामुळे बांधकाम विभागाची गोची होत आहे. जिल्हा परिषदेतील दोन्ही बांधकाम विभाग नेहमीच चर्चेत राहतात. येथील कार्यशैलीमुळे विविध स्वरूपाचे वाद निर्माण होतात. याबाबत बांधकाम एक तर सदैवच अग्रेसर राहिला आहे. आता आर्थिक वर्षात निधी खर्च करण्यासाठी घिसाडघाई केली जात आहे. नियमांना फाटा देऊन तयार करण्यात आलेले प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी ही शक्कल अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षातील निधी खर्च करण्यासाठी आणखी एक वर्षांचा अवधी आहे. मात्र २०१४ पर्यंतचा निधी याच वर्षात खर्च करावा लागणार आहे. बांधकाम विभागामध्ये चालणाऱ्या टक्केवारीच्या बाजारामुळे येथील प्रत्येक कामच संशयाने तपासले जाते. याही वर्षी अगदी शेवटच्या टप्प्यात शंभरावर कामे उरकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव स्विकृतीसाठी अर्थ विभागाकडे पाठविण्यात येत आहे. नियम १४२ अन्वये प्रत्येक कामाला अर्थ विभागाकडून स्विकृती मिळविणे आवश्यक असते. आजपर्यंत मागील तारखेत कामे पूर्ण केली जात होती. अनेक कामांचे तर कार्यादेशही होण्यापूर्वीच कामे उरकण्यात येत होती. आता या प्रकाराला कात्री लावण्यासाठी अर्थ विभागाकडून आपल्या अधिकाराचा वापर केला जात आहे. मुख्य लेखा वित्त अधिकारी सुरेश शहापूरकर यांनी बांधकाम विभागाकडून स्विकृतीसाठी आलेल्या प्रत्येक फाईलवर दिनांक टाकणे सुरू केले आहे. हिच बाब अनियमितता करणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. आतापर्यंत अर्थ व बांधकाम विभागातील समन्वय एका टक्क्यापर्यंत जुळून होता. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याला छेद दिला आहे. त्यामुळेच बांधकाम विभागाच्या एकंदर कामकाजाचे बिंग फुटले आहे. २०१४ पर्यंतचा निधी खर्च न झाल्यास तो परत जाण्याची भीती आहे. शिवाय २०१५ पर्यंतच्या निधीतील अनेक कामे मोठ्या आत्मविश्वासाने मंजुरी अभावीच पुर्णत्वास आणण्याचा खटाटोप काही ठिकाणी करण्यात आला आहे. आता या प्रकरणामुळे बांधकाम विभागाला मोठी अडचण निर्माण झाली आहे. यावर पदाधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये चुळबुळ निर्माण झाली आहे. नव्याने प्रभार घेतलेल्या कार्यकारी अभियंत्यांकडून या प्रकरणात हात वर करण्यात आले आहे. जुन्याच अभियंतांच्या कार्यकाळातील पेंडींग कामे पूर्ण करण्याची धडपड करत असल्याची केविलवाणी ओरड त्यांच्याकडून होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)