शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी रोडचे बांधकाम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:22 IST

येथील बसस्थानक चौक ते आर्णी रोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे बांधकाम खात्याच्या तपासणीत उघड झाले आहे.

ठळक मुद्देपीडब्ल्यूडीचे कंत्राटदाराला पत्र : चूक दाखविणाºया अभियंत्यालाच हटविले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बसस्थानक चौक ते आर्णी रोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे बांधकाम खात्याच्या तपासणीत उघड झाले आहे. त्यावरून संबंधित कंत्राटदाराला बांधकाम खात्याने नोटीसही बजावली आहे. दरम्यान, कंत्राटदाराला राजकीय पाठबळ मिळाल्याने बांधकाम प्रशासनावर दबाव निर्माण झाला. त्यातूनच निकृष्टतेची चूक दाखविणाºया उपअभियंत्यालाच हटविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया यवतमाळ शहरातील बसस्थानक ते वनवासी मारुती मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण व सुधारणा केली जात आहे. ३८ कोटी ५० लाख रुपये किंमत असलेल्या या मार्गाच्या बांधकामाची लांबी साडेतीन किलोमीटर एवढी आहे. २४ मीटर रुंदीच्या या मार्गावर फुटपाथ, डिवायडर, पथदिवे राहणार आहे. वीज वाहिनीसाठी सहा कोटी तर जलवाहिनीसाठी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या मार्गावर सुमारे एक किलोमीटर क्षेत्रात ३० मीटर रोड उपलब्ध होणार असून त्या ठिकाणी सहा मीटरमध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे. डीटीसीपीएल व बीसीसीपीएच (जे.व्ही.) या नागपुरातील कंपनीमार्फत हे बांधकाम सुरू आहे. कागदावर वनवासी मारुतीपर्यंत हे काम मंजूर असल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात या मार्गावरील स्मशानभूमीनंतरच्या एका हॉटेलपर्यंतच हे काम केले जाणार असल्याचे सांगितले जाते. त्या भागातूनच या कामाची सुरुवात करण्यात आली. रस्त्यासोबतच दोन्ही बाजूच्या नाल्याचे बांधकाम केले जात आहे. परंतु हे बांधकाम करताना करारातील निकष कंत्राटदाराकडून पाळले जात नसल्याचा आक्षेप या कामावर नियंत्रण ठेवणाºया उपअभियंत्याने घेतला. त्यामुुळे हे काम निकृष्ट दर्जाचे व नियम, निकष झुगारून केले जात आहे. ड्रेनेजच्या कामामध्ये बेड काँक्रिटच्या खाली मेटलचा थर योग्य नसणे, रेती व मुरूमऐवजी केवळ मुरूम वापरणे, नालीची कॉम्पॅक्टरने दबाई न करणे, चाचण्यांसाठी साहित्य उपलब्ध नसणे, वारंवार सांगूनही प्लॅस्टिसायजर न वापरणे अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी आहेत. सदर उपअभियंत्याने आपल्यावरील प्रचंड दबाव झुगारून कंत्राटदारांना नोटीस बजावली. शिवाय आपल्या वरिष्ठांनासुद्धा याबाबत अवगत केले. मात्र त्यानंतरही या रोडवरील कामाच्या गुणवत्तेवर फारसा फरक पडला नाही. उलट गुणवत्तेवर आक्षेप घेणाºया उपअभियंत्यालाच अचानक बदलविण्यात आले. राजकीय-प्रशासकीय दबावाला भीक न घालणाºया या कर्तव्यकठोर अभियंत्याची बदली करून त्या ठिकाणी कंत्राटदार व सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या सोयीचे अभियंते नेमण्यात आले आहे. त्यामुळे आर्णी रोडवरील या कामावर यंत्रणा एका विभागाची आणि नियंत्रण ठेवणारे अधिकारी दुसºया विभागाचे, अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे परिवहनमंत्री महामार्गांच्या बांधकामात गुणवत्तेचा आग्रह धरीत असले तरी स्थानिक राजकीय नेतेमंडळी मात्र गुणवत्तेला तेवढी किमत देत नसल्याचे या प्रकरणावरून दिसून आले. आतापर्यंत किमान २५ टक्के काम अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात दहा टक्के झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी डीटीसीपीएल कंत्राटदार कंपनीचे प्रमुख विशाल ठक्कर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या अभियंत्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.आर्णी रोडचे काम सुरू आहे. तेथे अभियंत्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांच्या पाहणीत कामांमध्ये आढळलेल्या त्रुट्या कंत्राटदाराला सांगून त्या दुरुस्त करण्यात आल्या. ही प्रक्रिया पुढेही चालणार आहे. गुणवत्तेनुसारच काम करून घेतले जाईल. १८ महिन्यात हे काम पूर्ण करून घेतले जाईल. गेल्या सहा महिन्यात दहा टक्के काम झाले आहे. एक किमीचा रस्ता काँक्रीटीकरणापर्यंत आला आहे. तर नाली दोन किमी झाली आहे. हा मार्ग शहरातून जात असल्याने प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्युत पोल, वाहिन्या, जलवाहिन्या, टेलिफोन लाईन या कामांवर बांधकामाची गती अवलंबून आहे.- वाय.एस. लाखाणीकार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, यवतमाळबांधकाम खात्याने या कामाबाबत काही त्रुट्या दाखविल्या आहेत. त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. करारानुसारच बांधकामाची गुणवत्ता राखली जाईल. पुढेही बांधकाम खात्याकडून दाखविल्या जाणाºया त्रुट्यांचे स्वागतच आहे. त्या तत्काळ दुरुस्त करून गुणवत्तेवर भर दिला जाणार आहे.- रमेश सोनीअभियंता, डीटीसीपीएल, नागपूर