शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

संविधान हे प्रत्येकाच्या कल्याणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार म्हणाले, स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. संविधानाविषयीच्या अनेक बाबी या ग्रंथात समाविष्ट असल्याने त्याला मिनी संविधान म्हटले जायचे. सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध असलेल्या मसुद्यावर अनेकदा निर्णय घेणे सोपे गेले आहे.

ठळक मुद्देदेवीदास घोडेस्वार : प्रज्ञा-शील-प्रतिभा संवैधानिक लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठानचे संयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपला देश एकसंघ राहावा, तो कधीही तोडला जाऊ नये यासाठी सुमारे ३०० लोकप्रतिनिधींच्या साक्षीने भारताचे संविधान तयार करण्यात आले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी संविधान अत्यंत उपयुक्त आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व हे संविधानाचे मुलभूत तत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार यांनी केले.येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात प्रज्ञा-शील-प्रतिभा संवैधानिक लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान यांच्या संयोजनात आयोजित व्याख्यानात त्यांनी आपले विचार मांडले. ‘भारतीय संविधानाची मुलभूत संरचना : सांसद आणि सर्वोच्च न्यायालय’ असा व्याख्यानाचा विषय होता.प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार म्हणाले, स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. संविधानाविषयीच्या अनेक बाबी या ग्रंथात समाविष्ट असल्याने त्याला मिनी संविधान म्हटले जायचे. सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध असलेल्या मसुद्यावर अनेकदा निर्णय घेणे सोपे गेले आहे. आरक्षणाच्या बाबतीत घटनेमध्ये कुठेही मर्यादा विषद केली नसली तरी, सर्वोच्च न्यायालयाला हे माहीत होते की, समानतेच्या मुलभूत तत्त्वाला बाधा येईल असे अमर्याद आरक्षण देता येणार नाही. हा निष्कर्ष स्टेट्स अँड मायनॉरिटीज यातून लावण्यात आला आहे, असे ते म्हणाले.सरकारी उद्योगांचे खासगीकरण, आरक्षणाला आव्हान देणे, मुस्लीमांचे तुष्टीकरण, न्यायपालिकेत सरकारी हस्तक्षेप, लोकशाही मूल्ये जोपासणाऱ्या संस्था मोडीत काढणे, शिक्षण क्षेत्रात भांडवलदारांना प्रवेश, शिक्षणाचे ब्राह्मणीकरण आदी बाबी संविधानाला धोका पोहोचविणाºया असून लोकशाहीला मारक आहेत. त्या वेळीच थांबविणे काळाची गरज आहे, असे प्रा. घोडेस्वार म्हणाले.यावेळी रवी मानव यांचेही भाषण झाले. मंचावर प्रमोद अजमिरे, प्रवीण मोरे, वैशाली फुसे, धम्मा कांबळे, अंकुश वाकडे, नामदेव थूल, अ‍ॅड. सोपान कांबळे आदी उपस्थित होते. समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, कवडुजी नगराळे, विलास काळे, जनार्दन मनवर, विष्णू भितकर, रवी श्रीरामे, के.एस. नाईक आदींचीही उपस्थिती होती.आजचे व्याख्यानस्मृती पर्व महिला समिती ‘वुमेन्स विंग्ज ऑफ आंबेडकराईट्स मुव्हमेंट’ यांच्या संयोजनात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होणार आहे. अतुल खोब्रागडे प्रमुख वक्ते आहे. ‘लोकशाही पायदळी तुडविली जात आहे, कारणीभूत कोण? आपणच !’ असा व्याख्यानाचा विषय आहे.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन