शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

काँग्रेस, शिवसेना, प्रहारचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:02 IST

लोकसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात आज अखेरच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना व प्रहारने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर प्रहारने रक्तदान, बैलबंडी रॅली, निवडणूक निधीसाठी झोळी असा अभिनव प्रयोग करून नागरिकांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा : प्रहारचे रक्तदान अन् उमेदवार बैलगाडीतून, निवडणूक निधीसाठी झोळी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात आज अखेरच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना व प्रहारने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर प्रहारने रक्तदान, बैलबंडी रॅली, निवडणूक निधीसाठी झोळी असा अभिनव प्रयोग करून नागरिकांचे लक्ष वेधले.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता. बहुतांश प्रमुख उमेदवारांनी सोमवारीच नामांकन दाखल केले. या मतदारसंघात एकूण ३० उमेदवारांनी ३९ नामांकन दाखल केले आहे. ८७ नामांकन अर्जांची उचल झाली होती. त्यापैकी ३९ सादर झाले. उमेदवारांना २८ मार्चपर्यंत आपले नामांकन मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप केले जाईल.नामांकनासाठी काँग्रेसने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर थेट महादेव मंदिरात ही नेते मंडळी दर्शनासाठी गेली. या मेळाव्याच्या व्यासपीठावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते, आमदार उपस्थित होते. काँग्रेस आघाडीच्यावतीने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नामांकन दाखल केले.शिवसेनेच्यावतीने भावना गवळी यांनी नामांकन दाखल केले. पाचव्या टर्मसाठी त्यांचे हे नामांकन आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई खास नामांकनासाठी अमरावतीवरून आले होते. शिवसेनेनेही नामांकनापूर्वी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भाजपा-शिवसेनेचे मंत्री, आमदार व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने शेतकरी विधवा व अंगणवाडी सेविका वैशाली येडे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. यवतमाळात नुकत्याच पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वैशाली येडे या उद्घाटक होत्या. या नामांकनासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धत अवलंबिली. त्यांनी येथे शिवतीर्थावर २५ बॉटल्स रक्तदान करून नामांकन रॅलीला प्रारंभ केला. बैलगाडीतून उमेदवाराला जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आले. आमचा उमेदवार गरीब आहे, निवडणूक लढण्यासाठी त्याच्याकडे पैसा नाही, त्यामुळे जनतेनेच हा पैसा द्यावा म्हणून लोकवर्गणीसाठी प्रहार कार्यकर्त्यांनी यवतमाळ शहरात झोळी फिरविली. प्रहार कार्यकर्त्यांची ही आगळीवेगळी पद्धत यवतमाळकरांसाठी लक्षवेधक ठरली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण पवार यांनीही सोमवारी नामांकन दाखल केले.भाजपाच्या बंडखोराचे शिवसेनेपुढे आव्हानकाँग्रेस व शिवसेना या प्रमुख दोन्ही पक्षाच्या उमेदवारांपुढे बंडखोरांचे आव्हान आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी अपक्ष नामांकन दाखल केल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. या बंडोबांना थंड करताना प्रमुख उमेदवारांची कसोटी लागणार आहे. यातील काहींनी केवळ चर्चेसाठी तर काहींनी ‘तडजोडी’साठी नामांकन दाखल केल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. पुसद तालुक्यातील एका अपक्षाने सलग तब्बल ३३ व्या निवडणुकीसाठी आपले नामांकन दाखल केले. अखेरचा दिवस असल्याने नामांकनासाठी गर्दी होईल, याचा अंदाज घेऊन पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. एलआयसी चौकातच सर्वांना रोखले गेल्याने उमेदवार व त्यांच्या सोबतीला असलेल्या नेत्यांना पायदळ जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागले. तिरंगा चौकात एकाच वेळी अनेकांच्या रॅली आल्याने कोण कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा, कोण कुणासाठी आला हे ओळखणे कठीण झाले होते. काँग्रेस उमेदवाराच्या व्यासपीठावर झाडून आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.