शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसीविरुद्ध वणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने संसदेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पारित केले आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांनी केला. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे हे भारतीय राज्य घटनेचे उल्लंघन असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देएसडीओ कार्यालयासमोर ठिय्या : वणी, झरी, मारेगावचे कार्यकर्ते सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एनआरसी व सीएए हे नागरिकत्व दुरूस्ती विधेयक त्वरित मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी गुरूवारी कॉंग्रेसच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने संसदेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पारित केले आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांनी केला. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे हे भारतीय राज्य घटनेचे उल्लंघन असल्याचेही ते म्हणाले.नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे बहुजनविरोधी असून बहुमताच्या भरवशावर केंद्र सरकार या देशावर कायदे लादत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी वसंत जिनींगचे अध्यक्ष अ‍ॅड.देविदास काळे, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष पुरूषोत्तम आवारी, मोरेश्वर पावडे, वणीच्या माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर, रफिक रंगरेज, समाजवादी पार्टीचे रज्जाक पठाण यांचीही भाषणे झाली. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.या आंदोलनात वणीसह मारेगाव आणि झरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी सीएए आणि एनआरसीच्या विरोधात काही काळ घोषणाबाजीसुद्धा केली.या आंदोलनात यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ओम ठाकूर, वणी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विवेक मांडवकर, मारेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल देरकर, वणी शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, वणी शहर माजी अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, इजहार शेख, भास्कर गोरे, वणी तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्ष वंदना धगडी, निलीमा काळे, शाहीदभाई, अशोक नागभीडकर, अभिजीत सोनटक्के यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीcongressकाँग्रेस