यवतमाळ : पोटाला चिमटा मारून आईवडिलांनी आम्हाला शिकविले. मोठय़ा खस्ता खाऊन विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. पात्रता असूनही नोकरीसाठी दारोदार भटकंती करण्याची वेळ आली. यावेळेस सत्तापरिवर्तनातून हाताला काम मिळेल असे वातावरण देशभरात होते. त्यामुळेच एकदा विरोधी बाकावरील लोकांना संधी द्यावी म्हणून नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील एनडीऐच्या बाजूने मतदान केले. देशात आता मोदीचे सरकार येणार असूनलोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवरकायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने पुढाकर घेतला पाहिजे. राजकीय नेत्यांचा देशाबाहेर असलेला काळा पैसा परत आणला जाईल, ही अपेक्षा ठेऊनच सत्तापरिवर्तनासाठी आम्ही युवकांनी पुढाकार घेतल्याचे ललित राठोड याने सांगितले. सत्तारुढ पक्ष भ्रष्टाचाराने बरबटला होता. एवढेच नाही तर, अनेक दोषींना लोकसभेच्या मैदानात उतरवून जनतेच्या भावनेशी खेळण्यात आले. त्यामुळेच सत्तापरिवर्तनात युवकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला, असे मत आशिष हातागडे याने मांडले. अश्वजित शेळके हा युवक म्हणाला, आतापर्यंत दलितांवर खूप अत्याचार झाले. परंतु खर्या अर्थाने न्याय मिळाला नाही. दलितांना घाबरवत ठेऊन राजकीय पक्षांनी आपली पोळी शेकली. महायुतीच्या शासन काळात दलितांवर अन्याय होणार नाही, असा आशावाद त्याने व्यक्त केला.इद्रीस खान याने आता ग्रामीण, वृध्द, अशिक्षित, बेरोजगार आणि गरिबांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रकाश धवने म्हणाला, सरकार कोणाचे येणार यापेक्षा बेरोजगारांसाठी ते काय करणार, हे पाहावे लागणार आहे. आतापर्यंंत काँग्रेस सरकारने निराश केले. त्यामुळे भाजप सरकारकडून आम्हा युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षणाकडे आता जातीने लक्ष दिले जाईल, आशा आशावाद सुनील चव्हाणने केला.आम्ही आमचे काम केले. आता सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करायची आहे. खासकरून बेरोजगारांसाठी काय करणार, याकडे आमचे लक्ष राहणार असल्याचे संतोष गदई याने सांगितले. शिवम इंगोले म्हणाला, आता खर्या अर्थाने देशाची प्रगती होईल आणि देश महासत्ता होईल. एकंदरीत युवकांच्या मनामध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रचंड आकर्षण आणि विश्वास असल्याचे दिसून आले. मात्र येणार्या काळात युवकांचा विश्वास किती सार्थ ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (लोकमत चमू)‘अच्छे दिन आने वाले है’ ची आशा निर्माण झाल्याच्या भावना नवमतदारांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. ‘लोकमत’ने शुक्रवारी अनेक युवकांशी मनमोकळा संवाद साधला. आकाश पवार याने मोदी सरकारामुळे बेरोजगारांची समस्या सुटेल, अशी आशा व्यक्त केली. स्थानिकांना रोजगार आणि प्रत्येक मतदारसंघात नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. शेतमालावर आधारीत प्रकल्प आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज प्रवीण राठोड याने व्यक्त केली. अनेक वर्षांपासून यवतमाळचा रेल्वे प्रश्न प्रलंबित आहे. आता तरी तो सुटला पाहिजे, अशी अपेक्षा अक्षय अतकरी याने व्यक्त केली.
हाताला कामासाठी काँग्रेसला ‘हात’
By admin | Updated: May 17, 2014 02:11 IST