शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या समितीने जाणले दुष्काळाचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:07 IST

काँग्रेसच्या समितीने जिल्ह्यातील नेर व यवतमाळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना बुधवारी दुपारी भेट दिली. नेर तालुक्यातील खरडगाव व आजंती, यवतमाळ तालुक्यातील पांढरी व धानोरा येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्या व दुष्काळाची दाहकता जाणून घेतली.

ठळक मुद्देनेर, यवतमाळ तालुक्यात दौरा : विधानसभेतील काँग्रेस उपनेत्यांपुढे ग्रामस्थांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/नेर : काँग्रेसच्या समितीने जिल्ह्यातील नेर व यवतमाळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना बुधवारी दुपारी भेट दिली. नेर तालुक्यातील खरडगाव व आजंती, यवतमाळ तालुक्यातील पांढरी व धानोरा येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्या व दुष्काळाची दाहकता जाणून घेतली.काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत ही समिती गठित झाली आहे. आमदार वडेट्टीवार, आमदार रणजित कांबळे, आमदार वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे, यवतमाळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, नतिकोद्दीन खतीब, बाळासाहेब मांगुळकर, राहुल ठाकरे, प्रवीण देशमुख, जीवन पाटील, अरुण राऊत, बाबासाहेब गाडे पाटील, सिकंदर शहा, डॉ.टी.सी. राठोड, विनायक भेंडे, धनराज चव्हाण, अनिल गायकवाड, सय्यद इस्तेहाक, वासुदेव महल्ले, अतुल लोंढे, देवानंद पवार ही नेते मंडळीही उपस्थित होती.आजंती व खरडगाव येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. या गावात चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. पीक विमा, पीक कर्ज व शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे दिले नसल्याचे सांगितले. पीक कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याचे वास्तव ग्रामस्थांनी मांडले. कृषीपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित आहे. रोहयोची कामे सुरू केलेली नाही. आजंती येथील पारधी बांधव घरकुलाच्या योजनेपासून अद्यापही वंचित आहे असल्याचे ग्रामस्थांनी समितीला सांगितले. नेर तालुक्यात राजेंद्र माहुरे, अनिल पाटील, दिलीप पाटील, रत्ना मिसळे, वंदना मिसळे, दिलीप खडसे, गणेश भुसे, नितीन मलमकार आदी उपस्थित होते. नेरचा दौरा आटोपून समिती यवतमाळ तालुक्यातील पांढरी या कायम पाणीटंचाई असलेल्या गावात पोहोचली. तेथून धानोरा येथील ग्रामस्थांची भेट घेऊन दुष्काळाचे वास्तव जाणून घेतले. या समस्या विधीमंडळात मांडण्याचे आश्वासन आमदार वडेट्टीवार यांनी दिले.

टॅग्स :congressकाँग्रेस