शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सवलतधारकांचा प्रवास, 'एसटी'ची दणक्यात कमाई

By विलास गावंडे | Updated: June 21, 2024 22:07 IST

नऊ कोटींवर लाभार्थी : महिनाभरात मिळाले ५४४ कोटींचे उत्पन्न

यवतमाळ : तिकिटात सवलतीचा लाभ घेत महिनाभरात ९ कोटी २४ लाख २३ हजार ३१४ नागरिकांनी लालपरीतून प्रवास केला. या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५४४ कोटी ४३ लाख ८७ हजार २९५ रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे. उन्हाळ्यातील सुट्या आणि लग्नसराईमुळे मे महिन्यात सवलतधारक प्रवाशांची संख्या वाढीचा फायदा महामंडळाला मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना सवलतीत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पुरस्कारार्थी, रुग्ण आदी ३३ घटकांचा यामध्ये समावेश आहे. महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत, तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या नागरिकांना मोफत प्रवास आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी प्रवास सवलतीची वेगवेगळी टक्केवारी आहे. शिवाय काही योजनांतर्गत शंभर टक्के मोफत प्रवास आहे.

या योजनांचा लाभ घेणारे प्रवासी नियमित असले, तरी उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईत ही संख्या वाढत असल्याचे दिसून येते. एप्रिल २०२४मध्ये सर्व प्रकारच्या सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ८ कोटी ७९ लाख ६० हजार ६८९ एवढी होती. मे २०२४मध्ये ती ९ कोटी २४ लाख २३ हजार ३१४ एवढी झाली होती. एप्रिलमध्ये काही दिवस शाळा, महाविद्यालये सुरू होती. यावरून मे महिन्यात लग्नसराई आणि उन्हाळी सुट्यांमध्ये सवलतीत प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे, हे स्पष्ट होते.उत्पन्नातही झाली वाढ

सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून महामंडळाला एप्रिल २०२४ मध्ये ५२२ कोटी ७५ लाख ४ हजार ३४२ रुपये एवढी कमाई झाली होती. मे महिन्यात ५४४ कोटी ४३ लाख ८७ हजार ३९५ रुपये एवढे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालयांना मे महिन्यात सुट्या होत्या.३४१ कोटींची उधारी

सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती शासनाकडून महामंडळाला केली जाते. अर्थातच शासनाकडे ही उधारी असते. महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. १०० रुपये तिकीट असल्यास एसटी तत्काळ ५० रुपये वसूल करते. उर्वरित ५० रुपये शासनाकडून मिळतात. अशा प्रकारे मे महिन्याचे ३४१ कोटी ३५ लाख ८४ हजार १७५ हजार रुपये शासनाकडे उधार आहेत.महिना - लाभार्थी - प्रवासभाडे - वसूल रक्कम - शासनाकडून घेणेएप्रिल - ८,७९,६०,६८९ - ५,२२,७५,०४,३४२ - १,८८,८९,३६,२११ - ३,३३,८५,६८,१३२

मे - ९,२४,२३,३१४ - ५,४४,४३,८७,२९५ - २,०३,०८,०३,१२० - ३,४१,३५,८४,१७५ 

टॅग्स :state transportएसटी