शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपच्या मंत्र्यांपुढे काँग्रेसचा सामान्य चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

यवतमाळ मतदारसंघात एकच व्यक्ती सलग दोन वेळा निवडून आल्याचा अलिकडचा इतिहास नाही, हा इतिहास बदलविण्यात मदन येरावार यशस्वी ठरतात का याकडे नजरा लागल्या आहेत. भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर व शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात ही लढत होत असली तरी ढवळे नेमके कुणाला नुकसानकारक ठरणार याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ज्ञांनाही कठीण होऊन बसले आहे.

ठळक मुद्देतिहेरी लढत : शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे कुणाच्या फायद्याचे?, संभ्रम कायम

भाजपचे वजनदार मंत्री, आर्थिक दृष्ट्या संपन्न मदन येरावार यांच्यापुढे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने जनसामान्यांचा चेहरा म्हणून बाळासाहेब मांगुळकर यांना रिंगणात उतरविले आहे. शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे यांचीही उमेदवारी असल्याने येथे तिहेरी सामना होणार आहे.यवतमाळ मतदारसंघात एकच व्यक्ती सलग दोन वेळा निवडून आल्याचा अलिकडचा इतिहास नाही, हा इतिहास बदलविण्यात मदन येरावार यशस्वी ठरतात का याकडे नजरा लागल्या आहेत. भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर व शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात ही लढत होत असली तरी ढवळे नेमके कुणाला नुकसानकारक ठरणार याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ज्ञांनाही कठीण होऊन बसले आहे. यवतमाळ मतदारसंघातील भाजपचा कारभार मुंबईपर्यंत गाजला आहे. त्यातून पक्ष, कार्यकर्ते व मतदारांमध्ये भाजप विरोधात निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा काँग्रेस व सेना बंडखोराला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी सेनेतील महत्वाच्या घटकांनी साथ सोडल्याने व काहींनी आघाडीचा धर्म सोडून भाजपला साथ दिल्याने संतोष ढवळे यांचा अवघ्या १२०० मतांनी पराभव झाला होता. पक्षाच्या चिन्हावर त्यावेळी ५० हजारांवर मिळालेली मते डोळ्यापुढे ठेऊनच ढवळे पुन्हा रिंगणात उतरले. मात्र आता अपक्ष म्हणून यापैकी किती मतदार ढवळेंच्या पाठीशी उभे राहतात हे पाहणेही तेवढेच महत्वाचे ठरते. या मतदारसंघात १३ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत.विकास कामांसाठी आणलेला कोट्यवधींचा निधी, लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला मिळालेली ३७ हजार मतांची आघाडी, नगरपरिषदेतील सत्ता, जिल्हा परिषदेतील सत्तेचा सहभाग आदी बाबी भाजपकडून आक्रमकपणे मतदारांपुढे ठेवल्या जात आहे. परंतु गेल्या पाच वर्षात भाजपची गाजलेली प्रकरणे, पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचा निर्माण झालेला दुरावा, वाढलेली गुन्हेगारी, त्याला मिळणारा राजकीय व पर्यायाने प्रशासकीय सपोर्ट, त्यातूनच व्यापारी, व्यावसायिक व जनमाणसात निर्माण झालेली दहशत आदीबाबी भाजपसाठी नुकसानकारक ठरत आहे. त्यातच आता यवतमाळ मतदारसंघात भाषिक वादही जन्म घेतो की काय अशी हूरहूर पहायला मिळते आहे.बेंबळाचे पाणी न मिळणे, रस्ते उखडणे, त्यामुळे मनुष्य व वाहनांचे आरोग्य धोक्यात येणे आदी बाबी मतदारांमध्ये आधीच प्रमुख चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्याच वेळी ‘माझी उमेदवारी यवतमाळातील गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी’ हे काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचे आवाहन मतदारासाठी आशादायी ठरत आहे. दहशतीत वावरणाऱ्या जनतेसाठी यानिमित्ताने आपला कुणी तरी वाली आहे अशी भावना निर्माण झाली आहे. त्याचा फायदा काँग्रेसला अधिक प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हेगारीच्या निमित्ताने भाजपकडून काँग्रेसवर पलटवार केले जात असले तरी तो इतिहास झाल्याने त्याचा जनतेवर फार काही परिणाम होताना दिसत नाही.प्रहारचे बिपीन चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे योगेश देशमुख पारवेकर, स्वतंत्र विदर्भाचा झेंडा घेऊन अ‍ॅड. अमोल बोरखडे, बसपाचे संदीप देवकते हेसुद्धा मतदारसंघात आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे समाजातीलच नव्हे तर भाजप व संघ परिवारातील प्रतिष्ठीत मंडळी निवडणुकीत दुरावा ठेऊन असताना काँग्रेसमध्ये मात्र अनेक गट-तट एकजुटीने काम करताना दिसतआहे. 

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ