महागाव तालुका : तीन दिवसांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांडलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात कापूस भरलेल्या वाहनांची रांग लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तब्बल १२५ वाहने कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव तीन दिवसांपासून मुक्काम ठोकावा लागला आहे.येथील बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर खरेदी सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी मिळेल त्या वाहनात भरून कापूस विक्रीस आणला. १२५ वाहने बाजार समितीच्या प्रांगणात उभी आहे. मात्र तीन दिवसांपासून कापूस खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दररोज दीड-दोन हजार रुपये खर्च करावा लागत आहे. वाहनभाडे देणेसुद्धा अवघड झाले आहे.सध्या बाजार समिती केवळ बैलगाडीतील कापूस खरेदी करीत आहे. दुसरीकडे तोंड बघून काही वाहने आत सोडली जात आहे. बाजार समिती संचालक व अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने शेतकºयांची हेळसांड होत आहे. यंदा तालुक्यात तब्बल २२ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याने बºयापैकी उत्पादन झाले. मात्र बाजार समितीकडून नियमितपणे कापूस खरेदी होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. बाजार समिती सध्या गोदाम बांधकाम आणि धरम काटा उभारणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सोमवारी दुपारपासून कापूस खरेदी सुरू करण्यात आल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.माहितीच मिळत नाहीतालुक्यातील पिंपळगाव येथील हेमंत रामराव राठोड यांनी गेल्या तीन दिवसांपासून कापूस विक्रीस आणला आहे. त्यांचे वाहन ठिय्या मांडून आहे. मात्र कापूस खरेदी केला जात नाही. बाजार समितीकडून व्यवस्थित माहिती दिली जात नाही, असा आरोप हेमंत राठोड यांनी केला.
बाजार समितीत कापूस वाहनांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST