शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण आयुक्त तीन पंचायत समित्यांची घेणार झाडाझडती, शिक्षण विभाग अलर्ट  

By अविनाश साबापुरे | Updated: April 18, 2023 19:12 IST

‘एलपीडी’मध्ये असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाची खबरबात घेण्यासाठी खुद्द राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे बुधवारी दिवसभर जिल्ह्यात तळ ठोकणार आहेत.

यवतमाळ : ‘एलपीडी’मध्ये असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाची खबरबात घेण्यासाठी खुद्द राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे बुधवारी दिवसभर जिल्ह्यात तळ ठोकणार आहेत. आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागासह पंचायत समित्यांमध्येही मंगळवारी दिवसभर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ पाहायला मिळाली. सूरज मांढरे हे सुरुवातीला वर्धा जिल्हा परिषदेत भेट देऊन कळंब पंचायत समितीमध्ये धडकणार आहेत. 

तेथील बीआरसी केंद्रातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर कळंब येथीलच चिंतामणी हायस्कूल व तालुक्यातील सुकळी येथील उपक्रमशील जिल्हा परिषद शाळेला भेट देणार आहेत. या शाळेतील विद्यार्थीभिमुख उपक्रमांची भुरळ संपूर्ण राज्याला आधीच पडलेली आहे. तीच कीर्ती ऐकून खुद्द आयुक्तही या शाळेला भेट देणार आहेत. दुपारी मांढरे हे यवतमाळ तालुक्यातील आदर्श शाळा तिवसा येथील ‘भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळे’ची पाहणी करतील. त्यानंतर यवतमाळ पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या कार्यालयांनाही ते भेटी देणार आहेत. तसेच बाभूळगाव पंचायत समिती व तेथील बीआरसी केंद्राचा आढावा घेतल्यानंतर चिमणाबागापूर येथील विवेकानंद विद्यालयाला भेट देऊन ते सायंकाळी अमरावतीकडे रवाना होणार आहेत. 

आधार, बदल्यांवर होणार का चर्चा?शाळांमधील उपक्रमांच्या पाहणीनंतर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे हे कार्यालयीन कामकाजाचीही माहिती घेणार आहेत. याच सुमारास शिक्षक संघटनांनी त्यांना निवेदन देण्याचीही तयारी केली आहे. विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन झाल्याशिवाय वेतन अनुदान दिले जाणार नाही, या आयुक्तांच्या आदेशाने जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अडचणीत सापडले आहेत. तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचेही गुऱ्हाळ सुरूच आहे. हे मुद्दे आयुक्त आपल्या अजेंड्यावर घेणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

आयुक्तांसाठी दुपारची शाळा सध्या कडक उन्हाळ्यामुळे शाळा सकाळ पाळीत भरविल्या जात आहेत. मात्र बुधवारी शिक्षण आयुक्त जिल्ह्यात येणार असून ते विविध शाळांना भेटी देणार आहेत. त्यावेळी विद्यार्थी शाळांमध्ये हजर दिसावे, याकरिता संबंधित शाळा दुपार पाळीत भरविण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळा