शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
3
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
4
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
5
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
6
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
7
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
9
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
10
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
11
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
12
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
13
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
14
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
15
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
16
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
17
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
18
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
19
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
20
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   

काँग्रेसच्या दोन गटांतील शीतयुद्ध थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकळंबमध्ये समन्वयाचा अभाव : विधानसभा निवडणुकीत फटका बसूनही वेगळ्या चुली

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : विधानसभा निवडणुकीत तालुका काँग्रेसच्या दोन गटांत समन्वयाचा अभाव होता. त्याचा परिणाम काँग्रेस तालुक्यात मोठ्या फरकाने माघारली. सर्वत्र कमळ फुलले. आता निवडणूक संपली, असली तरी काँग्रेसच्या दोन गटातील शीतयुध्द पूर्णविराम घ्यायला तयार नाही.सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यामुळे शुक्रवारी काँग्रेसच्या एका गटाने तहसीलदारांना निवेदन दिले. असे असताना पुन्हा शनिवारी प्रवीण देशमुख गटाकडून याच विषयावर निवेदन दिले. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसच्या दोन गटात अजुनही दिलजमाई झाल्याचे दिसून येत नाही. या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये असलेले वैर परावभवानंतरही संपायचे नाव घ्यायला तयार नाही.दोन गटातील कार्यकर्त्यांचे आत्मीय मनोमिलन करण्याची जबाबदारी प्रा.वसंत पुरके यांची आहे, असे मत व्यक्त होत आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. समन्वय नसल्याचा फटका प्रा.पुरके यांना विधानसभेतही बसला. आता तर लवकरच कळंब नगरपंचायतच्या निवडणुकीचे नगारे वाजायला सुुरुवात होणार आहे. या निवडणुकीत तिकीट वाटप करणे काँग्रेससाठी मोठे आव्हानात्मक राहणार आहे. दोन गटातील लोकांनी एकत्र आल्याशिवाय भाजप-सेनेपासून सत्ता हिसकाऊन घेणे कठीण होणार आहे.गावातूनच पत गमवणारे गावपुढारी कम नेते तालुक्याच्या राजकारणात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याच्याच दबावाला बळी पडत ‘नेतृत्व’ व्यूहरचना आखतात. सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनेला कुठलीही किंमत दिली जात नाही. त्यामुळे कालपर्यंत जवळ असणारे आज मात्र दुरावले जात आहे. याचा विचार काँगे्रस पक्ष जेवढ्या लवकर करतील तेवढा त्यांचाच फायदा होणार आहे. अन्यथा संघटनात्मक शक्ती नसतानाही भाजपचे कमळ आणि शिवसेनेचा बाण जोराने सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस