शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील ब्राह्मणी फाटा झाला कोळसा हेराफेरीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 10:19 IST

खाणीतून ट्रकद्वारे आणला जाणारा कोळसा थेट रेल्वे सायडिंगवर न नेता वणी बायपासवर असलेल्या ब्राह्मणी फाट्यावर उतरविल्या जातो. ब्राम्हणी फाटा कोळसा हेराफेरीचे केंद्र झाला आहे.

ठळक मुद्देवणी वेकोलि क्षेत्ररात्रभर चालतो माती मिश्रणाचा गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खाणीतून ट्रकद्वारे आणला जाणारा कोळसा थेट रेल्वे सायडिंगवर न नेता वणी बायपासवर असलेल्या ब्राह्मणी फाट्यावर उतरविल्या जातो. ब्राम्हणी फाटा कोळसा हेराफेरीचे केंद्र झाला आहे. तेथे चांगल्या प्रतीचा कोळसा वेगळा करून उर्वरित कोळशात काळ्या रंगाची माती व दगड मिसळविले जातात. त्यानंतर तेथून तो माती, दगड मिश्रित कोळसा रेल्वेसायडिंगवर पोहचविला जातो, अशी माहिती पुढे आली आहे.दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत’मध्ये वणी वेकोलि क्षेत्रात सुरू असलेल्या कोळसा चोरीबद्दल वृत्तमालिका प्रकाशित केली जात आहे. त्यामुळे कोळसा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पोलीस यंत्रणाही या तस्करांवर पाळत ठेऊन आहे. वणी बायपासवरील ब्राम्हणी मार्गाच्या पुढे वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी आहेत. या मार्गाने दररोज मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. याच मार्गावर किमान चार ठिकाणी कोळशाची हेराफेरी केली जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ दिली. निळापूर-ब्राह्मणी या गावांच्या पुढे कोलारपिपरी, पिंपळगाव, जुनाड, निलजई, नायगाव, उकणी आदी कोळसा खाणी आहेत. त्यामुळे वाहतुकीदरम्यान, कोळशाची हेराफेरी करणे सोईचे जावे, यासाठी रस्त्याच्या अगदी कडेला ट्रकमधील कोळसा डम्प करून नंतर त्यात हेराफेरी केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. असे असले तरी वेकोलि प्रशासन अथवा पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या हेराफेरीतून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.कोळशात माती व दगड मिश्रण करणारे मजूरही गुंड प्रवृत्तीचे असून यासाठी त्यांना मोठी रक्कम अदा केली जात असल्याचे कळते. या मजुरांजवळदेखील घातक शस्त्रे असतात, असे सांगितले जाते. कोळशात माती व दगड मिसळविल्यानंतर कोळशाने भरलेला ट्रक वणी रेल्वे सायडिंगवर आणला जातो, त्यावेळी अनेकदा या कोळशाचे मोजमापही केले जात नसल्याची माहिती आहे. यासाठी संबंधित ‘काटाबाबू’ला देखील मोठी बिदागी दिली जात असल्याची चर्चा आहे. एकूणच हा तस्करीचा व्यवसाय सर्व पातळ्यांवर ‘मॅनेज’ असल्याने कोणत्याही कारवाया होताना दिसत नाही.मिश्रणासाठी कोळसा खाणीतीलच दगड-मातीकोळशात केलेली हेराफेरी उघड होऊ नये, यासाठी खाणीतूनच दगड आणि माती आणली जाते. या दगड आणि मातीचा रंगही काळाच असतो. त्यात काही प्रमाणात कोळशाची बारीक चुरीदेखील असते. त्यामुळे तो कोळसा आहे की दगड आहे, हे सहज लक्षात येत नाही. कोळशात त्याचे मिश्रण केल्यानंतर तर लक्षात येत नाही. त्यामुळे कोळसा तस्कर हा फंडा वापरत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा