शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘प्रियदर्शिनी’साठी ‘सीएम’ने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 23:25 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सहकारावर आधारित एकमेव प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सूत गिरणीचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.

ठळक मुद्देविजय दर्डा : सूत गिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सहकारावर आधारित एकमेव प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सूत गिरणीचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीची २७ वी आमसभा रविवारी येथे अँग्लो हिंदी हायस्कूलमध्ये पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना विजय दर्डा म्हणाले, शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. ५० हजाराच्या पीककर्जासाठी बँका शेतकºयांना फिरवितात, उंबरठे झिजवायला लावतात, तर दुसरीकडे अनेक बड्या कंपन्यांकडे बँकांची एक लाख कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी आहे. हा विसंगत कारभार न उलगडण्यासारखा आहे. सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी बँक आॅफ इंडियाशी बोलणी सुरू आहे. मंत्री, मुख्यसचिव यांच्या स्तरावरही पाठपुरावा केला जात आहे. आता खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच यात पुढाकार घेऊन प्रियदर्शिनी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे आणि आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा द्यावा, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमापूजनाने सूत गिरणीच्या आमसभेला प्रारंभ झाला. व्यासपीठावर सूत गिरणीचे संचालक माणिकराव भोयर, बाळासाहेब मांगुळकर, किशोर दर्डा, राजीव निलावार, डॉ. प्रताप तारक, कैलास सुलभेवार, डॉ. जाफरअली जीवाणी, प्रकाशचंद छाजेड, लीलाबाई बोथरा, सुधाकरराव बेलोरकर, डॉ. अनिल पालतेवार, संजय पांडे, जयानंद खडसे, उज्ज्वला अटल आदी उपस्थित होते.देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सूत गिरणीचे दिवंगत संचालक संतोष भूत यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सूत गिरणीचे उपाध्यक्ष कीर्ती गांधी यांनी सांगितले की, बँक आॅफ इंडियाला उचललेल्या कर्जापेक्षा कितीतरी अधिक रक्कम व्याजापोटी दिली गेली आहे.या व्याजचक्राने सूत गिरणीचे कंबरडे मोडले आहे. परंतु त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास सुतगिरणी पुन्हा सुरू होईल, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा