शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

ढगाळी वातावरणाची धडकी

By admin | Updated: October 25, 2014 22:46 IST

एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागचे संकट अद्यापही संपले नाही. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि कापूस फुटला असताना ढगाळी वातावरण निर्माण झाले.

संकटाची मालिका : सोयाबीन काढणीचा हंगामयवतमाळ : एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागचे संकट अद्यापही संपले नाही. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि कापूस फुटला असताना ढगाळी वातावरण निर्माण झाले. काढलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा उडत असून या वातावरणाने शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा धडकी भरविली आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला सातत्याने बसत आहे. यंदा तर संकटाची मालिकाच सुरू आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली. दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यातून वाचलेल्या पिकांवर किडींनी आक्रमण केले. शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाने पुन्हा दगा दिला. अपरिपक्व शेंगात ज्वारीच्या दाण्याऐवढे सोयाबीन आहे. एकरी दहा पोते व्हायचे तेथे दोन पोतेही होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत शेतकरी सोयाबीन काढणीच्या तयारीला लागला. नेमकी हीच वेळ साधून पुन्हा निसर्गाची अवकृपा होत आहे. शुक्रवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. आकाशात शनिवारी दिवसभर काळे ढग जमले होते. काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. बदलते वातावरण पाहून शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली. शेतात काढलेला सोयाबीन झाकण्यासाठी धांदल सुरू झाली. आधीच उत्पन्नाची हमी नाही, त्यातच भाड्याने ताडपत्र्या आणून सोयाबीन झाकावे लागत आहे. सोयाबीन सारखीच कपाशीची स्थिती आहे. पाऊस आल्यास फुटलेले बोंड पावसामुळे मातीत मिसळण्याची भीती आहे. अशा स्थितीत कापूस आणि सोयाबीन आता पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे. नव्या सरकारकडून आशाविधानसभेच्या निवडणुका आटोपल्या. लवकरच नवीन सरकार सत्तारुढ होणार आहे. शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नव्या शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. शासन सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला कसे धावून येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)