शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

उमरखेडात आता मटका ‘क्लोज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:33 IST

मटका-जुगारात जाणकारांना ओपन आणि क्लोजचे महत्व माहीत असते. आतापर्यंत खुलेआमपणे (ओपन) शहरात सुरू असलेला वरळी मटका ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी ‘क्लोज’ झाला. मटका अड्डा चालक भूमिगत झाले असून त्यांचे चेलेचपाटे रस्त्याने फिरुन पट्टी गोळा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देकाऊंटर रिकामे : अड्डा चालक भूमिगत, फिरत्या पट्टीवर जोर

एकनाथ पवार।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : मटका-जुगारात जाणकारांना ओपन आणि क्लोजचे महत्व माहीत असते. आतापर्यंत खुलेआमपणे (ओपन) शहरात सुरू असलेला वरळी मटका ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी ‘क्लोज’ झाला. मटका अड्डा चालक भूमिगत झाले असून त्यांचे चेलेचपाटे रस्त्याने फिरुन पट्टी गोळा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरातील नाग चौक, बसस्थानक चौक, पुसद रोड, ढाणकी रोड अशा अनेक ठिकाणी खुलेआम मटका सुरू आहे. मटका अड्ड्यांवर खुलेआमपणे पट्टी फाडली जात आहे. सामान्य नागरिकांना हा प्रकार दररोज दृष्टीस पडतो. मात्र पोलिसांची दृष्टी अद्यापही या मटका अड्ड्यांवर पडली नाही. त्यामुळे संबंधित मटका अड्डा चालक व पोलीस यंत्रणेचे अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उमरखेडमध्ये मटका झाला ओपन या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी सकाळपासून सर्व मटका अड्डे मनुष्यविरहित झाले. अनेक अड्ड्यांवर केवळ बाकडे, खुर्चा आणि टेबलच दिसून येत होते. मात्र मटका पट्टी घेणारे भूमिगत झाल्याचे चित्र दिसून आले. गुरुवारी पांढरकवडा येथे खुलेआम मटका जुगार सुरू असल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी उघडकीस आणले होते. त्यानंतर सायंकाळी तातडीने तेथील ठाणेदाराची नियंत्रण कक्षात बदली झाली. तोच प्रकार उमरखेडमध्ये सुरू असतानासुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईची तसदी घेतली नाही. मात्र ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यामुळे अनेक महिलांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. याच प्रमाणे शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीवरसुद्धा प्रकाश टाकण्याची मागणी त्यांनी केली.कारवाईकडे लक्षंजिल्ह्यात पांढरकवडा ठाण्यात असाच प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तातडीने दखल घेत कारवाई केली. मात्र येथील या प्रकाराकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिकचे पोलीस अधिकारी शिरजोर झाले आहे. अधीक्षक कोणती कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी