ब्राम्हणगाव येथे स्मशानभूमीची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:49+5:302021-05-08T04:43:49+5:30

उमरखेड : व्हॉटसअ‍ॅपवर रंगलेल्या चर्चेतून गावातील सेवाभावी वृत्तीचे नागरिक एकत्र आले. त्यांनी समिती स्थापन करून गावातील स्मशानभूमीची साफसफाई केली. ...

Cleaning of cemetery at Bramhangaon | ब्राम्हणगाव येथे स्मशानभूमीची साफसफाई

ब्राम्हणगाव येथे स्मशानभूमीची साफसफाई

Next

उमरखेड : व्हॉटसअ‍ॅपवर रंगलेल्या चर्चेतून गावातील सेवाभावी वृत्तीचे नागरिक एकत्र आले. त्यांनी समिती स्थापन करून गावातील स्मशानभूमीची साफसफाई केली. हा आदर्श तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील गावकऱ्यांनी घालून दिला. प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार पैसे गोळा केले. त्यातून गावातील हिंदू स्मशानभूमीत जेसीबीद्वारे काटेरी झाडे झुडपे काढून साफसफाई केली. त्या जागी वृक्ष लागवड करून सौंदर्यीकरण केले. पाण्याची व्यवस्था करण्याचा मानस समितीचे अध्यक्ष गजानन कोंडरवाड व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ब्राम्हणगाव येथील नागरिकांच्या फ्रेन्डस् क्लब या व्हाॅटस्अ‍ॅप ग्रुपवर झालेल्या चर्चेतून समिती स्थापन करून स्मशानभूमीच्या १८ एकर जागेवर वृक्ष लागवड करून सौंदर्यीकरण करण्यासाठी सेवाभावी नागरिक सरसावले आहे. समिती अध्यक्ष गजानन कोंडरवार, संदीप गंधपवाड, बाबूराव कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य नयन पुदलवाड, रवी धबडगे, विठ्ठल गंधपवाड, कैलास कोंडरवाड, विश्वांबर लंकलवाड, संतोष गंधपवाड, सोनबा घोडेकर, आकाश देऊलवाड, अशोक निमलवाड, सरपंच परमात्मा गरुडे, नागनाथ ढोले, रामराव साळेकर, संतोष नालमवाड, संदीप गोरे, आनंद साळेकर, बंडू कर्नेवाड, नरेंद्र सुगमवाड आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Cleaning of cemetery at Bramhangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.