लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी उपविभागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संजय देरकर यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.चुकीचे मीटर रिडींग, मुदतीनंतर आलेले बिल, यात ग्राहकांची चूक नसतानाही अतिरीक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. बिल दुरूस्तीसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर त्रस्त झाले असून संजय देरकर यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. शेतीपंपाचे प्रलंबित कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावे, बीपीएलधारकांना १०० टक्के घरगुती कनेक्शन देण्यात यावे, रात्रीला शेतीपंपाला सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले. या समस्या आठ दिवसात सोडविल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही संजय देरकर यांनी दिला आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर, लतिफ खान, मो.असलम, संजय देठे, अरूण ताजने, लोकेश बोबडे, विठ्ठल बोंडे, राजू इद्दे, आकाश सूर, धर्मेश डोहे, डॉ.जगन जुनगरी, पांडुरंग हेपट, प्रेमानंद धानोरकर, रूद्रा कुचनकर, मनिष बतरा, भगवान मोहिते, दिवाकर कोल्हेकर, विलास कालेकर, विनोद ढुमणे, शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.
महावितरणच्या अनागोंदीमुळे नागरिक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:58 IST
वणी उपविभागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संजय देरकर यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
महावितरणच्या अनागोंदीमुळे नागरिक हवालदिल
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : संजय देरकर यांच्या नेतृत्वात वणी, मारेगाव व झरीत दिले निवेदन