शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शासकीय कार्यालयातील अनियमिततेने नागरिक त्रस्त

By admin | Updated: January 11, 2015 22:57 IST

शहरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. अनेक प्रकरणे तुंबली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

उमरखेड : शहरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. अनेक प्रकरणे तुंबली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एकाएका कामासाठी आठ ते १० दिवस उंबरठे झिजवावे लागतात. उमरखेड येथे तहसील, पंचायत समिती, कृषी, भूमीअभिलेख, आरोग्य आदी विविध कार्यालये आहेत. याठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नुकतेच उमरखेडला उपविभागीय महसूल कार्यालयही उघडण्यात आले आहे. परंतु कोणत्याच कार्यालयातील अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वचक नसल्याचे दिसून येते. याचा सर्वसामान्यांना नाहक त्रास सोसावा लागतो. तहसीलमध्ये अतिक्रमणाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. निराधार दररोज तहसीलमध्ये येरझारा घालत आहेत. विविध दाखले आणि अन्नपुरवठा विभागातही सावळा गोंधळ सुरू आहे. ठरलेल्या कालावधीत कोणतेच काम होताना दिसत नाही. महसूल अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ मंडळ अधिकारी आणि तलाठी शोधूनही सापडत नाही. अशीच स्थिती पंचायत समिती कार्यालयाची आहे. घरकुल योजनेच्या लाभासाठी अनेक नागरिक पंचायत समितीत येतात. परंतु कुणीही जाग्यावर भेटत नाही. पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागातही मोठी अनागोंदी दिसून येते. आरोग्य कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरातच भटकताना दिसतात. यामुळे लसीकरणासह अनेक कामे खोळंबली आहे. कृषी विभागाच्या कारभारापुढे तर शेतकऱ्यांनी हात टेकले आहे. मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक शेताच्या धुऱ्यावर दिसत नाही. उलट उमरखेडमध्ये दुचाकी घेऊन भटकताना दिसतात. शेतकऱ्यांच्या अडचणी ते कशा सोडवित असतील हा चिंतनाचा विषय आहे. तालुका भूमी अभिलेख हा सर्वांना निगडीत असलेला विभागही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेने नागरिकांची कामेच होत नाही. त्यामुळे ढाणकी, बिटरगाव, दराटी, मुळावा, पोफाळी या भागातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करीत आहे. (शहर प्रतिनिधी)