शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

चुलीवरच्या स्वयंपाकाचा हरवत चाललाय गोडवा

By admin | Updated: October 26, 2015 02:24 IST

शहराप्रमाणे ग्रामीण भागाचे चित्रसुद्धा या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे गावामध्येही स्वयंपाकघरात गॅसचा शिरकाव होऊन चुलीवरचा गोडवा हरवत चालला आहे.

नेर : शहराप्रमाणे ग्रामीण भागाचे चित्रसुद्धा या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे गावामध्येही स्वयंपाकघरात गॅसचा शिरकाव होऊन चुलीवरचा गोडवा हरवत चालला आहे. स्वयंपाक घरातील चुलीची जागा आता गॅस सिलिंडरने घेतली आहे. पूर्वी ग्रामीण भागात गोधन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे घरोघरी गोवऱ्या थापल्या जायच्या. पावसाळा गोवऱ्याच्या भरवशावर जायचा. जंगलातून सरपण आणण्याचीही तेवढी गरज नव्हती. आता मात्र गावातही गोवऱ्यापासून स्वयंपाक करणे कमी झाले असून केवळ पाणगे करण्यापुरत्याच गोवऱ्या वापरल्या जातात. शिवाय तुराट्या, पऱ्हाट्या, फणकट शेतातच स्वाहा केल्या जातात.पूर्वी याची सरपण म्हणून खेडोपाडी ओझे-ओझे जमा करून गंजी लावली जायची. आता त्या गंज्या अल्प आहेत. पूर्वी झाडे तोडण्याची गरज पडत नव्हती. चुलीवरचा स्वयंपाक हा मंद आणि हळू शिजत असतो. त्यामुळे त्यात अन्न कच्चे राहण्याची शक्यताही नसते. अर्धा स्वयंपाक तर निखाऱ्यावरच होऊन जात असे. मात्र चित्र पलटले असून केवळ हौसेपुरत्या घरी चुली राहिल्या आहेत. भाकर खावी तर चुलीवरची, अशी म्हण आजही सर्वत्र प्रचलित आहे. परंतु आता गॅसवरच भाकर केली जात असल्याने ती तेवढी कडक होत नाही. परिणामी त्याचाही गोडवा हरवत चालला आहे. लग्नसमारंभात केवळ भातकुलीचा खेळ मांडण्यापुरतीच चूल बांधली जात असून त्या पद्धतीचाही विसर पडण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या काळानुरूप शहरी भागाचे लोण आता ग्रामीण भागातही पडत असल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)