शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या प्रियकराला मुलांनी संपविले; वाघापूर येथे मध्यरात्री २ वाजता थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:56 IST

चौघांना घेतले ताब्यात : चाकूने सपासप वार केल्यानंतर डोक्यात दगड घालून काढला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणे युवकाच्या जिवावर बेतले. लग्नाच्या पत्नीला सोडून युवक महिलेच्या प्रेमात पडला. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेच्या दोन मुलांनी मित्राला सोबत घेऊन त्याचा खून केला. ही घटना सोमवारी पहाटे २ वाजतादरम्यान वाघापूर येथे घडली. या प्रकरणात लोहारा पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आशिष माणिकराव सोनोने (३४) रा. प्रिया रेसिडेन्सी, चौसाळा रोड, बोधड असे मृताचे नाव आहे. त्याचे वाघापुरातील महिलेशी प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आशिषची पत्नी मुलीला घेऊन विभक्त राहत होती. १५ मार्च रोजी दुपारी आशिषला प्रेयसीच्या मुलाने जिवे मारण्याची धमकी दिली होती. 

ही माहिती आशिषने त्याची आई सुनीता सोनोने यांना दिली. १७ मार्च रोजी आशिष त्याच्या प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत घराबाहेर निघाला. तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. 

आशिषला जागीच केले ठारसंतापलेल्या दोघांनी आईच्या प्रियकराला चाकूने भोसकून नंतर त्याच्यावर दगडाने प्रहार केला. यात आशिष सोनोने याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला होत असताना आशिषने आरडाओरडा केल्याने परिसरातील काही नागरिक रात्री २ वाजता घराबाहेर आले होते. सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम आला आहे. लोहारा पोलिसांना रात्रीच खुनाची माहिती मिळाली. त्यावरून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात दोन सख्खे भाऊ असून त्यांचे मित्र प्रशिक मुकुंदा दवणे, अंकुश डुबाजी चावरे यांचाही सहभाग आहे. या प्रकरणी सुनीता माणिकराव सोनोने यांच्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला आहे.

लोहारा परिसरात दुसरी घटनादारूच्या नशेत दोन सैतानांनी तीन तासांत चार गंभीर गुन्हे केले. एकाला जिवानिशी ठार केले. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे अनैतिक संबंधातून खुनाची दुसरी घटना घडली आहे. यामुळे लोहारा, वाघापूर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

वारंवार चिडआईसोबतचे अनैतिक संबंध पाहून मुलांना राग येत होता. अखेर त्यांचा संयम सुटला. सोमवारी रात्री त्याचा घात केला.

२ वाजता रात्री दरम्यान या हत्याकांडाने परिसर हादरलावाघापूर येथील एका परिसरात रात्री दोन वाजता आशिष सोनोनेची हत्या करण्यात आली. या घटनेचे काही प्रत्यक्षदर्शीही हादरुन गेले आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी