शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

बालहक्क दिन विशेष; बाल हक्क संरक्षणाच्या नावावर सरकारचा पोरखेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 12:40 IST

बालकांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी कायदा आहे. तो राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण युनिटही स्थापन झाले. पण युनिटमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी नेमण्याचाच सरकारला विसर पडलेला आहे.

ठळक मुद्देयुनिट आहे, पण माणसेच नाहीतदहा जिल्ह्यांना बालसंरक्षण अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बालकांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी कायदा आहे. तो राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण युनिटही स्थापन झाले. पण युनिटमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी नेमण्याचाच सरकारला विसर पडलेला आहे. त्यामुळे मंगळवारी जागतिक बालहक्क दिवस साजरा होत असला, तरी महाराष्ट्रातील बाल संरक्षणाचे युनिट पोरके आहे आणि बालसंरक्षणाच्या नावे सरकारचा पोरखेळ सुरू आहे.महिला व बाल विकास खात्याच्या अखत्यारित हे युनिट २०१० पासून जिल्हाधिकारी स्तरावर स्थापन करण्यात आले. पण खुद्द बालविकास मंत्र्यांच्याच बिड जिल्ह्याच्या युनिटमध्ये १२ पैकी ११ पदे भरलेली नाहीत. बालन्याय अधिनियमानुसार बालकांना जगण्याचा, सहभागाचा, विकासाचा आणि संरक्षणाचा असे चार महत्त्वाचे अधिकार आहेत. विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवून प्रत्येक बालकाचे हे अधिकारी अबाधित राखण्याची जबाबदारी बालसंरक्षण युनिटवर सोपविण्यात आली. प्रत्येक जिल्हास्तरावर १२ पदे निर्माण करण्यात आली आहे. मात्र अपवाद वगळता कोणत्याही जिल्ह्यात संपूर्ण पदे भरलेली नाहीत.त्यातही ९ जिल्ह्यांमध्ये तर १२ पैकी एकही पद भरण्यात आलेले नाही. मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, धुळे, जळगाव, नंदूरबार, हिंगोली, जालना, परभणी या जिल्ह्यांमधील सर्वच्या सर्व जागा रिक्त आहेत. तर महिला व बाल विकास मंत्र्यांचे गाव असलेल्या बिड जिल्ह्याच्या युनिटमध्ये १२ पैकी केवळ एकच पद भरलेले आहे. तीच स्थिती नांदेडच्या युनिटचीही आहे. विशेष म्हणजे, अनेक जिल्ह्यांत काही पदे भरलेली असली तरी या युनिटसाठी फर्निचर, संगणक अशा सुविधाच पुरविण्यात आलेल्या नाहीत.त्याहूनही गंभीर म्हणजे, या कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती नाही. अनेकांचे कंत्राट ‘रिनिव्ह’ करण्यासाठी कुचराई केली जात असल्याची ओरड आहे. तर यापुढे कार्यरत कर्मचाऱ्यांना कमी करून सरकार ‘आउटसोर्सिंग’चा मार्ग चोखाळण्याच्या मनस्थितीत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे बालसंरक्षण युनिटमधील कर्मचारी बेरोजगारीच्या धास्तीत आहेत.शाळांमध्येही बालहक्कांची पायमल्लीबालन्याय अधिनियमानुसार ० ते १८ वयोगटातील बालकांना चार महत्त्वाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यात शिक्षण घेण्याचा अधिकारही समाविष्ठ आहे. शिवाय मोफत व सक्तीच्या शिक्षणाचाही कायदा अमलात आलेला आहे. मात्र, महाराष्ट्रातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहे. त्यामुळे शिक्षण घेण्याचा बालकांचा अधिकार कोण संरक्षित करणार, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार