शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

प्रशासनाला गुंगारा देऊन बालविवाह, अखेर पोलिसात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

सविस्तर हकीकत अशी की, नेर तालुक्यातील मुकिंदपूर (पारधी बेडा) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह १७ एप्रिल रोजी ठरविण्यात आला होता. त्याची भणक लागताच जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या चमूने गावात पोहोचून हा बालविवाह रोखला होता. त्यावेळी मुलीच्या नातेवाइकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. मुलीचे वय १८ वर्ष होईपर्यंत तिचे लग्न न करण्याबाबत नातेवाइकांनी लिहून दिले होते.

ठळक मुद्देनेरमध्ये हमीपत्र अन् घाटंजीत सोहळा : अखेरच्या मंगलाष्टकाला धडकले पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा बालसंरक्षण कक्षाने चार दिवसांपूर्वी नेर तालुक्यात रोखलेला बालविवाह कायद्याला न जुमानता पुन्हा लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच मुलीचा लग्नसोहळा घाटंजी तालुक्यात आयोजित करण्यात आला. मात्र डीजेवर अखेरचे मंगलाष्टक वाजत असतानाच तहसीलदार, पोलीस अन् बालसंरक्षणचे कर्मचारी मांडवात धडकले अन् साऱ्यांची पळापळ झाली. शेवटी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूनच हा बालविवाह थांबविण्यात आला. सविस्तर हकीकत अशी की, नेर तालुक्यातील मुकिंदपूर (पारधी बेडा) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह १७ एप्रिल रोजी ठरविण्यात आला होता. त्याची भणक लागताच जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या चमूने गावात पोहोचून हा बालविवाह रोखला होता. त्यावेळी मुलीच्या नातेवाइकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. मुलीचे वय १८ वर्ष होईपर्यंत तिचे लग्न न करण्याबाबत नातेवाइकांनी लिहून दिले होते. मात्र त्यांनी केवळ प्रशासनाची दिशाभूल केली. नंतर त्याच मुलीचा विवाह घाटंजी तालुक्यातील पंगडी गावात वरमंडपी २० एप्रिलला आयोजित केला. परंतु, या चलाखीबाबत घाटंजी येथील तहसीलदार पूजा माटोडे यांना माहिती मिळताच त्यांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षाला अलर्ट केले. त्यानंतर पोलिसांसह संपूर्ण चमू थेट लग्नमंडपीच धडकली. तेव्हा लग्नाचा मंडप, डीजे, रोषणाई व नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा सुरू होता. शेवटचे मंगलाष्टक सुरु होते. मात्र वेळीच प्रशासन धडकल्याने सर्वांची तारांबळ उडाली. कोरोना काळातही मोठी गर्दी केल्याचे तसेच बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. या घटनेत संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम ९,१०, ११, भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८, २६९, ३४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५१(ब), महाराष्ट्र कोविड विनियमन २०२० च्या कलम ११ नुसार घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वधू व वधूचे आईवडील सध्यास्थितीत फरार आहे. ही कार्यवाही तहसीलदार पूजा माटोडे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात घाटंजीचे पोलीस उपनिरीक्षक भुजाडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आकाश बुर्रेवार, तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य अरुण कांबळे, ग्रामसेवक राजाराम बोईनवार, अंगणवाडी सेविका छाया चौधरी व अर्चना आत्राम, तलाठी मून, मोहन बागेश्वर, सरपंच यमुना मेश्राम, उपसरपंच प्रमोद कदम, कोतवाल अमोल घोडाम आदींनी पार पाडली.बालविवाहाबाबत माहिती असल्यास ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अथवा चाईल्ड लाइनला कळवावे, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले.

दोन तहसीलदारांचा अलर्ट या १६ वर्षीय मुलीचा सुरुवातीला नेरमध्ये विवाह ठरताच तेथील तहसीलदार अमोल पोवार यांनी तातडीने जिल्हा बालसंरक्षण कक्षाला सूचना दिली. प्रशासनाला गुंगारा देऊन या मुलीचा विवाह घाटंजी तालुक्यात होत असताना तेथील तहसीलदार पूजा मोटोडे यांनी कक्षाला अलर्ट करून बालविवाह रोखला.  

 

टॅग्स :marriageलग्न