शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मुख्यमंत्र्यांनी प्रियदर्शिनी सूत गिरणी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 05:47 IST

वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाहन : आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सहकारावर आधारित एकमेव प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सूत गिरणीचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीची २७ वी आमसभा रविवारी येथे अँग्लो हिंदी हायस्कूलमध्ये पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना विजय दर्डा म्हणाले, शेतकºयांची वाईट अवस्था आहे. ५० हजाराच्या पीककर्जासाठी बँका शेतकºयांना फिरवितात, उंबरठे झिजवायला लावतात, तर दुसरीकडे अनेक बड्या कंपन्यांकडे बँकांची एक लाख कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी आहे. हा विसंगत कारभार न उलगडण्यासारखा आहे. सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी बँक आॅफ इंडियाशी बोलणी सुरू आहे. मंत्री, मुख्यसचिव यांच्या स्तरावरही पाठपुरावा केला जात आहे. आता खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच यात पुढाकार घेऊन प्रियदर्शिनी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे आणि आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा द्यावा, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमापूजनाने सूत गिरणीच्या आमसभेला प्रारंभ झाला. व्यासपीठावर सूत गिरणीचे संचालक माणिकराव भोयर, बाळासाहेब मांगुळकर, किशोर दर्डा, राजीव निलावार, डॉ. प्रताप तारक, कैलास सुलभेवार, डॉ. जाफरअली जीवाणी, प्रकाशचंद छाजेड, लीलाबाई बोथरा, सुधाकरराव बेलोरकर, डॉ. अनिल पालतेवार, संजय पांडे, जयानंद खडसे, उज्ज्वला अटल आदी उपस्थित होते. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सूत गिरणीचे दिवंगत संचालक संतोष भूत यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सूत गिरणीचे उपाध्यक्ष कीर्ती गांधी यांनी सांगितले की, बँक आॅफ इंडियाला उचललेल्या कर्जापेक्षा कितीतरी अधिक रक्कम व्याजापोटी दिली गेली आहे. या व्याजचक्राने सूत गिरणीचे कंबरडे मोडले आहे. परंतु त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास सुतगिरणी पुन्हा सुरू होईल, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस