शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

डीएचओंच्या कारभाराने सीईओ अडचणीत

By admin | Updated: January 3, 2015 02:07 IST

ग्रामीण आरोग्याची नाडी असलेल्या जिल्हा आरोग्य विभागात गेल्या दिवसांपासून कुरबुरी सुरू आहे. पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीचा मोठा घोडेबाजार झाला.

यवतमाळ : ग्रामीण आरोग्याची नाडी असलेल्या जिल्हा आरोग्य विभागात गेल्या दिवसांपासून कुरबुरी सुरू आहे. पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीचा मोठा घोडेबाजार झाला. यातून अनेक प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत. आता न्यायालयाच्या अवमान प्रकरणात चक्क जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश मिळाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या कारभाराने सीईओ अडचणीत आले असून आरोग्य यंत्रणेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग ऐनकेन प्रकारे नेहमी वादात असतो. येथे कोणतेही काम नियमाला धरुन होत नाही. ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाले की मात्र काम बिनधोक होते. याचा फटका मात्र प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसतो. आपला व्यवहार निट चालावा यावरच अधिक भर दिला जातो. आरोग्य संघटनांंनी आंदोलन पुकारावे अशी परिस्थिती येथे जाणीवपूर्वक तयार केली जाते. वरिष्ठांची दिशाभूल करून हेतू साध्य करण्याचा फंडा येथे वापरला जात आहे. जिल्हा मुख्यालयालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी अंशत: बदलाचा कारभार केला जातो. औद्योगिक न्यायालयाने बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक हे रिक्त पद भरण्यासाठी स्थगनादेश दिला. त्यानंतरही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मर्जीतील कर्मचाऱ्याला येथे नियुक्ती दिली. आरोग्य कर्मचारी सुहास माडुरवार आणि मधुसुदन पिंगळे यांची १३ मार्च २०१३ ला आरोग्य सहायक म्हणून पदोन्नती करण्यात आली. माडुरवार यांना थेरडी आरोग्य केंद्र तर पिंगळे यांना झरी येथे देण्यात आले. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती घेण्यास नकार दिला. त्यानंतर २२ सप्टेंबर २०१३ ला शिरसगाव आरोग्य केंद्र्रात सेवानिवृत्तीने रिक्त जागेवर पदोन्नती मिळण्यासाठी पिंगळे यांनी अर्ज करताच, त्यांना सात दिवसात नियुक्ती आदेश देण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)