शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

चर्मकार समाजबांधव कचेरीवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:43 PM

राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेल्या आवाहनानुसार विविध मागण्यांना घेऊन चर्मकार समाजबांधव शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडकले. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेल्या आवाहनानुसार विविध मागण्यांना घेऊन चर्मकार समाजबांधव शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडकले. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, रविदास महाराज जयंती दिनी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ करून या महामंडळाला नवीन भागभांडवल उपलब्ध करून द्यावे, समाजाच्या उन्नतीसाठी चर्मकार आयोग स्थापन करावा, विविध जिल्ह्यात चर्मकार समाजावर झालेल्या अन्याय-अत्याचाराची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शासन करावे, पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे, सरस्वतीबाई बनसोडे (पानभोसी, जि.नांदेड), सविता संतराम सोनवणे (संख, जि.सांगली) यांच्या खुनाची सीबीआय चौकशी करावी आदी मागण्या केल्या आहेत.निवेदन देताना राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. हरिश पाचकोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. देवानंद तांडेकर, खुशाल डवरे, जिल्हाध्यक्ष नरेश खडतरे, पुरण तांडेकर, जिल्हा युवाध्यक्ष रवी बच्छराज, उपाध्यक्ष परशुराम मराठे, खुशाल मराठे, धर्मेंद्र बच्छराज, कमल झाडे, सागर मुराब आदी उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा