शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

एसटीपुढे आंतरजिल्हा वाहतुकीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 07:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान असणार आहे.

ठळक मुद्देदररोज ११ कोटींच्या नुकसानीची भीती

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू असताना ‘एसटी’ला किलोमीटरमागे दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. आता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान असणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे १८ हजार ५०० बसेस आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या सर्व बसेस पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करीत होत्या. एक किलोमीटरमागे ३० ते ३५ रुपये आवक, असे एसटीच्या उत्पन्नाचे ढोबळमानाने सूत्र आहे. मात्र विविध कारणांमुळे उत्पन्नाच्या या आकड्यापर्यंतही एसटी पोहोचू शकत नव्हती. २२ ते २३ रुपये उत्पन्न येत होते. परिणामी मागील काही वर्षात एसटीचा तोटा वाढत गेला आहे.

पूर्ण लॉकडाऊन काळात एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचा फटका बसत होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गंत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. एवढेही प्रवासी मिळविण्यासाठी एसटीला ‘आवाज’ मारण्याची वेळ आली आहे. तास-दीड तासात मिळेल तेवढे प्रवासी घेऊन एसटी मार्गस्थ होत आहे. मार्गात कुठेही थांबायचे नसल्याने थेट प्रवासी घेऊन बस निघत आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे.

आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्यानंतर सव्वाशे ते दीडशे किलोमीटरपर्यंत एसटीचा प्रवास होणार आहे. शंभर किलोमीटरमागे तीन हजार ५०० रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. निम्मे २२ प्रवाशाचे तिकीट भाडे १२५ रुपये झाल्यास दोन हजार ७५० रुपये एवढेच उत्पन्न येते. शंभर किलोमीटर मागे ७५० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. जाण्या-येण्याच्या एका फेरीमागे १५०० रुपयांचा दणका एसटीला बसतो. आज २२ प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. आंतरजिल्हा प्रवासी मिळण्यासाठी एसटीच्या नाकीनऊ येणार आहे. त्यामुळेच या वाहतुकीचे मोठे आव्हान एसटीपुढे आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरू करणे आवश्यकच आहे. मात्र एसटीचे नुकसान होणार नाही, ही बाबही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.संपूर्ण भाड्याचा आकार सरकारने द्यावाजिल्हा बाहेर वाहतूक सुरू करताना प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षा सांभाळणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे २२ प्रवासी वाहतूक करावी लागणार आहे. हे महामंडळ जनतेचे आणि सरकारचे आहे. तेव्हा एसटीचा वाढता तोटा लक्षात घेता संपूर्ण भाड्याचा आकार सरकारने एसटीला वेळेवर देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी नोंदविली आहे.

टॅग्स :state transportएसटी