शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांच्या बांधकामांना केंद्राची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 15:05 IST

‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत महामार्ग बांधकामातील कंत्राटदार-विकासक यांना दिलासा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे बड्या कंत्राटदार कंपन्यांना दिलासा, देयकेही तत्काळ देण्याचे आदेशकोविड-१९ चा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोविड-१९ चा परिणाम सार्वजनिक बांधकामांवरही झाला आहे. मजूरच नसल्याने लॉकडाऊन काळात ही कामे ठप्प झाली होती. त्यावर उपाय म्हणून आता या बांधकामांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत महामार्ग बांधकामातील कंत्राटदार-विकासक यांना दिलासा देण्यात आला आहे. ३ जून रोजी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे उपसचिव रमणदीप चौधरी यांनी या संबंधीचे आदेश जारी केले. लॉकडाऊन काळात वाहतूक ठप्प होती. सोशल डिस्टन्सिंगचेही बंधन होते. शिवाय कामावर राबणारे परप्रांतीय मजूरही आपल्या गावाकडे निघून गेले. त्यामुळे बांधकामे थांबली. करारानुसार नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदाराला दंड ठोठावला जातो. कंत्राटदार कंपन्यांची ही अडचण ओळखून केंद्र शासनाने हे आदेश जारी केले.

सुरक्षा ठेव रक्कम परत मिळणारत्यानुसार, कंत्राटदाराची सुरक्षा ठेव म्हणून असलेली रक्कम त्यांना परत करावी, पुढील तीन ते सहा महिने ही रक्कम हॅम व बीओटी कंत्राटदारांनाकडून वसूल केली जाऊ नये. बांधकाम कराराला तीन ते सहा महिने मुदतवाढ दिली जावी. ईपीसी व हॅम अंतर्गत कामांवरील कंत्राटदारांचे दरमहा बिल काढले जावे. पूर्वी कामाच्या विशिष्ट टप्प्यातच देयक काढले जात होते. परंतु आता जेवढे काम केले तेवढ्या कामाचेही बिल काढण्याचे आदेश जारी करण्यात आले.

उपकंत्राटदारालाही मिळणार थेट देयकएखाद्या कंपनीने उपकंत्राटदार नेमला असेल तर त्याला त्याच्या कामाचे देयक आता देता येणार आहे. एखाद्या कंत्राटदाराने बँक गॅरंटी नियोजित वेळेत सादर केली नसेल तर त्याला दंड लावू नये अशा सूचना आहेत. टोल आॅपरेटर, सुपरविझन करणारे कन्सलटंट यांनासुद्धा तीन ते सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

टोल टॅक्स वसुलीला सवलतबीओटी आणि टीओटी तत्वावरील बांधकामात निर्धारित काळात निर्धारित रकमेपेक्षा कमी टोल टॅक्स वसूल झाला असेल तर त्यातील मार्जीनची उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी पुढे तेवढी मुदतवाढ दिली जाईल किंवा तेवढी भरपाई देण्यात येईल. बीओटीवरील या वसुलीलाही मुदतवाढीचे आदेश आहेत. अशा विविध सवलती महामार्गांच्या बांधकामांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :highwayमहामार्ग