शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बँकेच्या विशेष लेखापरीक्षणाचे निर्देश; बँकेच्या संशयित व्यवहाराची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 18:16 IST

Yavatmal : संशयास्पद व्यवहाराची होणार चौकशी अहवालासाठी सात दिवसांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जवाटप, वसुली, सस्पेन्स खाते, विजयराव चव्हाण यांच्या खात्यामध्ये कोट्यवधी रुपये कसे आले?, अशा अनेक प्रकरणांत बँकेच्या संशयित व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अशोक बाबर व माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी शासनाकडे केली होती. तक्रारदारांनी दाखल केलेल्या प्रकरणात विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक जगदीश गवळे यांची नियुक्ती केली. ४ ऑक्टोबर रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महागाव तालुक्यातील हिवरा संगम शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर मध्यवर्ती बँकेच्या एकूणच कर्ज वाटप व्यवहारातील दोषी आढळून आलेल्या ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच निलंबन आणि फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. मध्यवर्ती बँकेच्या संशयित व्यवहाराची चौकशी करण्यासाठी विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षकांची नियुक्ती केली. सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बँकेच्या मागील पाच आर्थिक वर्षांमध्ये (२०१९-२० ते २०२३-२४) संशयित खात्यांमध्ये झालेले आर्थिक व्यवहार, मागील पाच आर्थिक वर्षांमध्ये (२०१९- २० ते २०२३-२४) विविध कार्यकारी संस्थांचे बँकेसोबत झालेले आर्थिक व्यवहार, बँकेने व्यापारी संकुलाला दिलेल्या कर्जाची प्रकरणे, विजय चव्हाण यांच्या व त्यांच्याशी संबंधित बँकेतील सर्व खात्यांची तसेच या खात्यावरून इतर खात्यावर झालेल्या व्यवहारांची तपासणी, १९ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या बँकेच्या कर्ज समितीच्या बैठकीत मंजूर व वितरित करण्यात आलेली कर्जे, या मुद्यांवर चौकशीची मागणी करण्यात आली होती.

स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवालाचे निर्देश मुद्यांची सखोल छाननी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सात दिवसात सादर करावा, असे निर्देश अमरावतीचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिले आहे. या आदेशानुसार बँकेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. लवकरच चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती तक्रारदार पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी दिली आहे.

"अशोक बाबर आणि पंजाबराव देशमुख यांची चौकशीची मागणी आहे. यावर चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी दिले आहे. अजून चौकशी सुरू झाली नाही." - अरविंद देशपांडे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ