यवतमाळ : लॉजमध्ये धाड घालून शहर पोलिसांच्या पथकाने तीन तरुण आणि एका अभियंत्यासह तीन पुरुषांना अश्लील चाळे करताना पकडले. ही कारवाई सोमवारी रात्री येथील पोस्ट आॅफिस चौक परिसरात करण्यात आली. चौकशीत संबंधित तरुणी या नागपूरवरून आयात करण्यात आल्याचे पुढे आले. गणपत संभाजी कापसे रा. उमरखेड असे पोलिसांच्या धाडीत सापडलेल्या अभियंंत्याचे नाव आहे. तर सत्यपाल पंढरी चव्हाण रा. दिघोरी (नागपूर) आणि संजय बळीराम ठाकरे रा.संजय गांधीनगर नागपूर अशी त्याच्या साथीदारांची नावे आहे. देहविक्रय करणाऱ्या तीन उच्चभ्रू तरुणी आणि तीन पुरुष येथील पोस्ट आॅफिस चौकातील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये अश्लील चाळे करीत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार दिलीप चव्हाण यांना मिळाली होती. त्यावरून फौजदार डॉ.अनुप वाकडे यांच्या पथकाला सोबत घेऊन त्यांनी तेथे धाड घातली. तसेच वेगवेगळ्या खोलीतून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणेदार चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
सेंटर पॉर्इंटमध्ये तीन तरुणींसह अभियंत्याला रंगेहात पकडले
By admin | Updated: August 5, 2014 23:35 IST