शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती महोत्सव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:46 IST

येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार मडकोनाचे शेतकरी महादेव हारगुडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देछत्रपती महोत्सव : परवेश शाह ‘शिवरत्न संगीत सम्राट’ने गौरवान्वित

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार मडकोनाचे शेतकरी महादेव हारगुडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच छत्रपती महोत्सवातील विविध १७ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस आणि सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.छत्रपती महोत्सवातील पुरस्कार सोहळयाचे आयोजन येथील समता मैदानावर ( पोस्टल ग्राउंड) सोमवारी रात्री करण्यात आले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, बांधकाम विभाग उपअभियंता मनोहर शहारे, मैत्र संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, प्रदीप वादाफळे, समता पर्वचे माजी अध्यक्ष अशोक वानखडे, नरेंद्र गुघाने, सुनील कडू, सुदर्शन बेले, पांडूरंग खांदवे, अरूण गेडाम, प्रवीण मुळे, सुधीर जवादे अविनाश शिर्के, नितीन मिर्झापूरे, सृष्टी दिवटे उपस्थित होते.यावेळी जगदंबा डेअरीचे संचालक पवन वातिले, रमन बोबडे यांना एटीएम दुध सेंटरच्या प्रयोगा सोबत रोजगार निर्मीतीला चालना दिल्याने गौरविण्यात आले. महोत्सवा दरम्यान पारपडलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात शिवरत्न संगीत सम्राट स्पर्धेत प्रथम क्रमांक परवेश शाह, द्वितीय अमोल काळे, तर तृतीय पुरस्कार शिवरत्न राऊत यांना देण्यात आला.शिव मॅरेथॉन स्पर्धात रिमा मेश्राम, गुंजन खिची, अवंतीका वासनिक, अजिंक्य गायकवाड, उज्वल कहाते, अभिजीत नाचपेलवार यांनी या स्पर्धेत बाजी मारली. सामान्यज्ञान स्पर्धेत दिव्या देवतळे, नाविण्य गुल्हाणे, दर्शन शेंडे, उर्वशी सवई, अभय कायरकर, मयुर कांबळे, रेणुका निवल, खुषी जाधव यांनी तर शिवकाव्य स्पर्धेत सर्वेश माहुरे, भारत खोब्रागडे, राधा जगताब यांनी वकृत्व स्पर्धेत लखन सोनुले, संतोष तावडे, हर्षल चव्हाण, प्रतीक्षा गुरनुले, पुजा शिंबरे, वृषाली देशमुख, सचिन चंदनखेडे, आशिष कांबळे, सानिका पेटकुले यांनी वेशभुषा स्पर्धेत सई इंगोले, ज्ञानदा देशमुख, यशस्वी घोडे, संकेत तंबाखे, आराध्य वानखडे, शर्वरी ढगे यांनी बाजी मारली. तर मॅरॉथॉन स्पर्धेत अजिंक्य गायकवाड, उज्वल कहाते, अभिजीत नाचपेलवार, रिना मेश्राम, अवंतीका वासनिक, गुंजन खिजी यांनी आणि किल्ले बनवा स्पर्धेत योगेश इंगळे, नितेश इंगळे, तेजस मिरासे, सृती वेळुकर, दामिनी चौधरी, अनिकेत कोतेकर यांनी पुरस्कार पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शिव विवाह सोहळाबक्षीस वितरण समारोहात योगेश धानोरकर आणि शितल तेलंगे यांचा शिव विवाह सोहळा पारपडला. समाजाला नवी दिशा देण्याचे काम या विवाह सोहळ्याने केले.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंती