शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

काडतूस तपास १३ शस्त्र परवान्यांवर केंद्रित

By admin | Updated: January 12, 2016 02:11 IST

हैदराबादच्या तिघांकडून जप्त केलेल्या पिस्तूल-बंदुकांच्या ६० जिवंत काडतुसांचा तपास पोलिसांनी १३ शस्त्र परवान्यांवर केंद्रित केला आहे.

१५ व्यक्तींचे छायाचित्रही जप्त : आरोपींचे लोकेशन मिळाले औरंगाबादमध्ये यवतमाळ : हैदराबादच्या तिघांकडून जप्त केलेल्या पिस्तूल-बंदुकांच्या ६० जिवंत काडतुसांचा तपास पोलिसांनी १३ शस्त्र परवान्यांवर केंद्रित केला आहे. हैदराबादचे काडतूस प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पुसदच्या पार्वतीनगरमधील रहिवासी इम्तियाज खॉ सरदार खॉ (२५) याच्या घराची झडती घेतली होती. या झडतीमध्ये तब्बल १३ व्यक्तींच्या नावाने शस्त्र परवाने, १५ व्यक्तींचे पासपोर्ट फोटो, त्यांचे आधारकार्ड, बंदूक साफ करण्याचे साहित्य आढळून आले होते. ते पोलिसांनी जप्त केले आहे. १३ व्यक्तींच्या नावे आढळलेले शस्त्र परवाने खरे की खोटे याचा शोध घेतला जात आहे. संबंधित व्यक्तींच्या दाखविलेल्या रहिवासी पत्यांवर जाऊन सदर व्यक्ती खरोखरच अस्तित्वात आहे की नाही हे तपासले जात आहे. पोलीस सूत्रानुसार, इम्तियाज खॉ याचा पिता सरदार खॉ यांचे हैदराबादमधील गौस आर्म्स या शस्त्र व दारूगोळा विकणाऱ्या परवाना प्राप्त दुकानासोबत कनेक्शन आहे. सरदार खॉच्या ओळखीतूनच त्याचा मुलगा इम्तियाज खॉ याचीही तेथे ओळख झाली. या गौस आर्म्समधूनच हा दारूगोळा बोलविल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात सदर दुकानात या दारूगोळा पुरवठ्याच्या कोणत्याही नोंदी पोलिसांना आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे परवान्याआड अवैधरीत्या दारूगोळ्याचा पुरवठा केला जात असावा असा संशय पोलिसांना आहे. दारूगोळा पोहोचला याचा अर्थ शस्त्रे आधीच पोहोचली असावी, असा अंदाज पोलीस वर्तवित आहे. जप्तीतील काडतूस हे हत्ती, रोही या सारख्या मोठ्या प्राण्यांना मारण्यासाठी उपयोगी पडत असल्याचे सांगितले जाते. इम्तियाज खॉ हा शस्त्र व दारूगोळ्याचा व्यवसाय केंव्हापासून करतो, त्याच्यामार्फत आतापर्यंत कुणा-कुणाला व कुठे-कुठे पुरवठा झाला याचा शोध घेतला जात आहे. शिवाय पासपोर्ट फोटो असलेले व्यक्ती कोण, शस्त्र परवाना सापडलेल्या व्यक्तींकडे खरोखरच शस्त्रे आहेत का? हे शोधले जात आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास एलसीबी अथवा एसडीपीओकडे दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या मात्र हा तपास दराटी ठाणेदाराकडे असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी) पिता-पुत्राची गुन्हेगारी पार्श्वभूमीजिवंत काडतूस प्रकरणातील मुख्य संशयित इम्तियाज खा व त्याचा पिता सरदार खॉ या दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. सरदार खॉवर चंद्रपूर जिल्ह्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणात तो संचित रजेवरून कारागृहातून पसार आहे. सध्या हे दोघेही बाप-लेक पसार असून मध्यंतरी पोलिसांना त्यांचे लोकेशन औरंगाबादमध्ये मिळाले होते. या लोकेशनचा त्यांच्या अटकेसाठी पोलिसांना फार उपयोग होऊ शकला नाही. हैदराबादवरून काडतूस घेऊन येणारे तीन युवक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.