लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सण-उत्सव व इतर सुटीच्या दिवसातही कुटुंबात रममान न होणारे आई-वडील आज खऱ्या अर्थाने मुलांसोबत मुल बनून खेळले. कित्येक वर्षांपासून घराच्या अडगळीत असलेला कॅरम बोर्ड, अष्ठचंग, अंताक्षरी रंगली. मुलांनी आईला तर मुलींनी वडिलांना आपल्या संघात घेऊन या घरगुती खेळाचा मनमुराद आनंद लुटला. बऱ्याच दिवसांनी वडिलांनी तयार केलेले पदार्थही मुलांना चाखायला मिळाले. दिवस कसा गेला हे कळलेच नाही.पहाटेचा नास्ता झाल्यानंतरच टीव्हीसमोर बसण्याऐवजी घरगुती खेळाला सुरुवात झाली. काहींनी टेरेस्टवर जाऊन मिनी क्रिकेटचा आस्वाद घेतला.प्रशासनाने पुढील काही दिवस घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सर्वत्र कलम १४४ लागू केल्याने संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने घरात थांबून आहे.मिळालेल्या सुटीचा कुटुंबासोबत आनंद लुटणे नागरिक व्यस्त आहेत. काही ठिकाणी आजी-आजोबा, काका यांच्यासोबतही वेळ घालविण्यात आला. गप्पांमधून ज्येष्ठांनी आपले बालपण मुलांना सांगितले.१) अॅड. मनीष माहूरकर यांनी मुलांसोबत कॅरमचा आनंद घेतला.२) प्रमोद निळे यांच्या घरी लुडोचा खेळ तर कॅशिओवर अंताक्षरी.३) माणिक जाधव कुटुंबातील मुलींनी आईला अशी मदत केली.ही तर खरी संधीजनता कर्फ्यू या संकल्पनेमुळे घरात रममान होण्याची संधी मिळाली आहे. कोणत्याही कारणाने का असो ना कुटुंबातील संवाद कमी झाला होता. स्वत:चे आई-वडील, मुले यांच्यातही तितकी एकरुपता नव्हती. आता पूर्णवेळ घरात घालवायचा असल्याने सफाईच्या कामाला पुरुष मंडळींनीही हात घातला. मुलेही मदतीला धावून आली. काही मिनिटाच घराचा कानाकोपरा चकाचक झाला. विविध खेळ झाले. बºयाच दिवसांनी आजी-आजोबांच्या आठवणींना उजाळा मिळाला, अशी प्रतिक्रिया विविध कुटुंबातून व्यक्त होत आहे.
अडगळीतील कॅरम बोर्ड निघाला बाहेर, अंताक्षरीही रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST
बऱ्याच दिवसांनी वडिलांनी तयार केलेले पदार्थही मुलांना चाखायला मिळाले. दिवस कसा गेला हे कळलेच नाही. पहाटेचा नास्ता झाल्यानंतरच टीव्हीसमोर बसण्याऐवजी घरगुती खेळाला सुरुवात झाली. काहींनी टेरेस्टवर जाऊन मिनी क्रिकेटचा आस्वाद घेतला. प्रशासनाने पुढील काही दिवस घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सर्वत्र कलम १४४ लागू केल्याने संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने घरात थांबून आहे.
अडगळीतील कॅरम बोर्ड निघाला बाहेर, अंताक्षरीही रंगली
ठळक मुद्देमुलांमध्ये रमण्याची संधी : आई-बाबांचा संघ बनवून मुलांनी लुटला खेळाचा आनंद, घरगुती स्पर्धेतील विजेत्याला हातच्या खाऊचे बक्षीस