शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'अवनी'च्या दोन बछड्यांचाही जीव धोक्यात?; शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 17:33 IST

आईच्या शोधात दोन बछडे जंगलात फिरताहेत. ते एकदा दिसलेही होते, पण पुन्हा हरवले.

ठळक मुद्देवाघीण जिथे ठार झाली तिथे बछडे येण्याची शक्यता

- नरेश मानकर 

यवतमाळ: टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर आता अनाथ झालेल्या तिच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने युद्धस्तरावर शोधमोहिम सुरू केली आहे. दरम्यान रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शोध पथकाला वरूड डॅमजवळ दोन बछडे आढळून आले होते.बोराटीच्या जंगलात शुक्रवारी टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर वनविभागाचे पथक तिच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी सराटी, बोराटी, वरूड, भुलगड आदी भागातील जंगल परिसर पिंजून काढत आहे. रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास या पथकाला वरूड डॅम परिसरात दोन्हीही बछडे आढळून आले. परंतु झुडूपात लपून असलेले हे बछडे क्षणातच दुसरीकडे निघून गेले.टी-१ वाघिणीचे बछडे आपल्या आईच्या शोधार्थ इतरही ठिकाणी भटकू शकतात. त्यामुळे वनविभागाच्या शोध पथकाने बोराटी जंगलात ज्या नाल्याजवळ टी-१ वाघिणीला मारले, त्या परिसरात आपले लक्ष केंद्रीत केले आहे. टी-१ वाघिणीसोबत राहणारा नर वाघसुद्धा याच परिसरात असल्यामुळे हा वाघ या ११ महिन्याच्या बछड्यावर केव्हाही हल्ला करू शकतो. त्यामुळे या बछड्यांना तातडीने बेशुद्ध करून जेरबंद करणे आवश्यक आहे. या बछड्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता वनविभागासमोर आहे.टी-१ वाघिणीला तब्बल दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ठार करण्यात आले. त्यामुळे वनविभागाने व वाघग्रस्त परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या परिसरात नर वाघाचे व दोन बछड्यांचे वास्तव्य कायम असल्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती अद्यापही कायम आहे. हा नर वाघसुद्धा आपल्यावर हल्ला करू शकतो, अशीही भीती आहे.

बछड्यांच्या जीवित्वाची जबाबदारी कुणाची?१३ जणांचे बळी घेणाऱ्या टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर तिच्या बछड्याची जबाबदारी कोणावर, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे. या बछड्यांनाही बेशुद्ध करून जेरबंद न करता गोळ्या घालून ठार करणार काय? वाघिणीला ठार मारल्यानंतर इतर जंगली प्राण्यांचे परिसरातील ग्रामस्थांवर होणारे हल्ले थांबतील काय? असे प्रश्नसुद्धा वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केले आहे.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणTigerवाघ