शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काळीदौलतमध्ये तरुणाचा निर्घृण खून, तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

श्याम राठोड हा तरुण आपला भाऊ लक्ष्मण शेषराव राठोड याच्यासह काही कामानिमित्त दुचाकीवर निघाला होता. या दरम्यान बसस्थानक परिसरात त्याच्या दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित तरुणाने आपल्या साथीदारासह श्याम व त्याच्या भावाविरुध्द वाद घातला. वाद वाढत जावून श्यामवर तलवारीने वार करण्यात आले. यात श्यामचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.  

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव / पुसद : रस्त्याने जाताना केवळ दुचाकीचा धक्का लागला या कारणावरून दोन तरुणांचे भांडण पेटले. त्यातच दुचाकीस्वार तरुणावर तलवारीने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी भरदुपारी काळीदौलत खान येथे वर्दळीच्या ठिकाणी घडली. श्याम शेषराव राठोड (२२) रा. काळी असे या घटनेतील मृताचे नाव आहे. तर श्याम याच्यावर जीवघेणा हल्ला करणारे अज्ञात आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, श्यामचा खून झाल्याचे कळताच त्याच्या नातेवाईकांमध्ये हलकल्लोळ उडाला. काही नागरिकांनी सायंकाळी बसस्थानक परिसरात जाळपोळ केली. या घटनेला जातीय रंग आल्याने काही काळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. श्याम राठोड हा तरुण आपला भाऊ लक्ष्मण शेषराव राठोड याच्यासह काही कामानिमित्त दुचाकीवर निघाला होता. या दरम्यान बसस्थानक परिसरात त्याच्या दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित तरुणाने आपल्या साथीदारासह श्याम व त्याच्या भावाविरुध्द वाद घातला. वाद वाढत जावून श्यामवर तलवारीने वार करण्यात आले. यात श्यामचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.  खुनाची वार्ता  तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पुसद ग्रामीण पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.  ही घटना  दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणातून घडली की, मृत व हल्लेखोरांचे काही पूर्ववैमनस्य होते, या बाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहे. 

श्याम करीत होता पाेलीस भरतीची तयारी - २२ वर्षीय श्याम राठोड हा तरुण गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करीत होता. नुकतीच त्याला दुसऱ्या एका नोकरीची ऑफरही आली होती, अशी चर्चा आहे. मात्र शुक्रवारच्या हल्ल्यात श्याम संपला. गेल्या काही दिवसात किरकोळ वादातून थेट खुनाच्या घटना वाढत आहे. बेरोजगारी, असुरक्षितता आणि व्यसनाधिनता यातून अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले. 

कृतीदलाचे जवान पाचारण करून घटनास्थळी बंदोबस्त लावला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. गावकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. - डाॅ. दिलीप पाटील भुजबळजिल्हा पोलीस अधीक्षक

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी