शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुटाबुटात येऊन चोरले नववधूचे दागिने; यवतमाळातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:20 IST

यवतमाळ येथील बालकृष्ण मंगल कार्यालयात ३१ जानेवारीच्या रात्री लग्नसमारंभात सुटाबुटातील चोरट्यांनी जवळपास सहा लाखांवरील ऐवजावर डल्ला मारला.

ठळक मुद्देसहा लाखांच्या ऐवजावर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बालकृष्ण मंगल कार्यालयात ३१ जानेवारीच्या रात्री लग्नसमारंभात सुटाबुटातील चोरट्यांनी जवळपास सहा लाखांवरील ऐवजावर डल्ला मारला. यात वधूचे दागिने व दोन लाख ७५ हजार रुपये असलेली रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ उडाली. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.आकाश सुदाम निंगनूरकर यांच्या बहिणीचे आर्णी रोडवरील बालकृष्ण मंगल कार्यालय येथे लग्न होते. मुलीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्यात आले होते. शिवाय खर्चाकरिता दोन लाख ७५ हजार रुपये रोख सोबत घेतली होती. दागिने व रोख रक्कम आणि भेटस्वरूपात आलेले पैसे एका बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. ही बॅग निंगनूरकर यांनी आईकडे दिली. लग्न आटोपल्यानंतर विधी चालू असताना भटजीला पुजेची सामुग्री देण्यासाठी निंगनूरकर यांच्या आईंनी हातातील बॅग खाली ठेवली व याच संधीचा फायदा वºहाडी बनून आलेल्या चोरट्यांनी घेतला. २० ते २५ वयोगटातील दोन युवक सुटाबुटात आले होते. त्यांनीच ही बॅग लंपास केली. मात्र बॅग गेल्याचे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली होती. नातेवाईकांनी लग्न मंडपात व परिसरात शोधाशोध केली. कुणीही आढळून आले नाही. अखेर मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. यामध्ये २५ वयोगटातील अज्ञात तरुण ती बॅग बाहेर घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे. या आनंदाच्या सोहळ्यात चोरट्याने हातसाफ केल्याने या परिवाराला धक्काच बसला. मुलीच्या लग्नातच दागिने गेल्याने तिच्या आईलाही जबर धक्का बसला आहे. या प्रकरणी आकाश निंगनूरकर याने दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.पोलिसांकडून लॉजची झडतीलग्न समारंभात सुटाबुटात आलेले चोरटे हे शहराबाहेरील असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे पोलिसांनी ३१ जानेवारी व त्याच्या दोन दिवसापूर्वी लॉजमध्ये मुक्कामी असलेल्यांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पोलीस तपासाला गती मिळणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी