शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

हलगर्जीपणामुळे बालक दगावला

By admin | Updated: October 26, 2014 22:46 IST

एका नऊ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना येथील जोशी बालरूग्णालयात घडली. घटनेनंतर मृत बालकाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे काहीकाळ रूग्णालयात तणावाचे

यवतमाळ : एका नऊ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना येथील जोशी बालरूग्णालयात घडली. घटनेनंतर मृत बालकाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे काहीकाळ रूग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वडगाव रोड पोलीस तत्काळ तेथे पोहोचले आणि नातेवाईकांची समजूत काढली.यश मनोज हातागडे (९) रा. नेताजीनगर असे मृत बालकाचे नाव आहे. पोटात त्रास होत असल्याने शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वडील मनोज हातागडे यांनी त्याला डॉ. संजीव जोशी यांच्या जोशी बाल रूग्णालयात उपचारासाठी नेले. रूग्णांची गर्दी असल्याने यशच्या तपासणीसाठी दुपारी ४ वाजले. तपासणी करून डॉ. जोशी यांनी रक्ताची तपासणी करण्यास सांगितले. सायंकाळी ६ वाजता रक्त तपासणीचा अहवाल आला. तो पाहून डॉ. जोशी यांनी कुठलाही गंभीर आजार नसल्याचे मनोज हातागडे यांना सांगितले. त्यानंतर सलाईन देऊन डॉक्टर निघून गेले. मात्र यशच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. याउलट त्याचा त्रास वाढला. तेव्हा यशचे वडील मनोज यांनी ही बाब तेथील परिचारिकेच्या लक्षात आणून दिली. मात्र त्यांनी डॉक्टरांना झोपेतून उठविण्यास नकार दिला. अखेर रात्री १२.३० वाजताच्या सुमारास यशचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वडगाव रोड पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेनंतर मनोज हातागडे यांनी ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांना तक्रार दिली. तूर्तास ही तक्रार चौकशीत ठेवली आहे. रविवारी दुपारी यशच्या मृतदेहाचे पोलीस, पंच आणि व्हिडिओ चित्रिकरणात शवविच्छेदन करण्यात आले. यासंदर्भात ठाणेदार जाधव यांना विचारणा केली असता उत्तरीय तपासणी अहवाल आणि तज्ञ डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करणार असल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)