शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात कंटेनरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:05 IST

दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.

ठळक मुद्दे३५ लाखांचे नुकसान : दिल्लीवरून हैद्राबादकडे जात होता कंटेनर

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसचा आर.जे.१०-जी.बी.२०५८ क्रमांकाचा कंटेनर दिल्ली येथील शोरूममधील चपला, बुट, दुचाकी व चारचाकी वाहनांचे टायर, आॅईलचे डब्बे, पंखे, खेळाचे साहित्य, सिडीजचे डब्बे, चपला, बुट तयार करण्याचा कच्चा माल व स्टेशनरी सामान घेऊन हैद्राबादकडे जात होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हैद्राबाद मार्गावरील वाय पॉर्इंटवर डाव्या बाजुला कंटेनर लावून चालक व क्लिनर शहरातील जवळच असलेल्या एटीएम केंद्रात पैसे आणावयासाठी गेले. पैसे घेऊन परत कंटेनरजवळ येत नाही तोच, त्यांना कंटेनरच्या कॅबिनमधून धुराचे लोट येताना दिसले. क्षणार्धात कंटेनरच्या कॅबिनला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. हे दृष्य दिसताच, या रस्त्याने जाणाºया राजेश्वर पारीख व कुणाल राशतवार यांनी पोलीस व नगरपरिषदेला माहिती दिली. तोपर्यंत कॅबिनमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले.त्यानंतर ही आग झपाट्याने कॅबिनच्या मागे असलेल्या कंटेनरमधील साहित्याकडे गेली. आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, पांढरकवडा नगरपरिषदेचे टँकर, फायर ब्रिगेड तातडीने घटनास्थळी पोहोचले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, कंटेनरमधील ५० टक्क्यापेक्षा जास्त साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर असलेल्या वाय पॉर्इंटवर उभ्या कंटेनरला आग लागल्याचे वृत्त वाºयासारखे पसरताच नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली होती. काही वेळ वाहतुकही ठप्प झाली होती. ठाणेदार रामकृष्ण महल्ले व सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यतासध्या उष्णतामानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक होरपळून निघत आहेत. आगी लागण्याच्या प्रमाणाताही वाढ होत आहे. कंटेनरला लागलेली ही आग अतिउष्णतेने शॉर्टसर्किट होऊन लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. कंटेनरची बॅटरी किंवा इंजिन गरम होऊन ठिणगी पडून ही आग लागली असावी, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसच्या मालकाला देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी सांगितले. या आगीत ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :fireआग