शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पाेफाळी पाेलीस ठाण्यातच दोघांनी घातला वर्दीवर हात अन्‌ अडकविण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

सहायक फाैजदार प्रकाश भाेसले हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना दाेघे जण तेथे आले. त्यांनी काही एक न ऐकता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल केले, असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी पाेलीस शिपाई ज्ञानेश्वर मस्के याने समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आराेपींनी तू मध्ये बाेलणारा काेण, असे म्हणून थेट शिवीगाळ करून अंगावर हात घातला. पाेलीस ठाण्यातच आराेपींनी शिपायाची काॅॅलर पकडली. इतकेच नव्हे तर त्यांनी ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल केले, असे म्हणून थेट पाेलीस ठाण्यातील अंमलदार सहायक फाैजदारालाच धक्काबुक्की करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांना खाेट्या ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. हा प्रकार उमरखेड तालुक्यातील पाेफाळी पाेलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी  घडला. सहायक फाैजदार प्रकाश भाेसले हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना दाेघे जण तेथे आले. त्यांनी काही एक न ऐकता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल केले, असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी पाेलीस शिपाई ज्ञानेश्वर मस्के याने समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आराेपींनी तू मध्ये बाेलणारा काेण, असे म्हणून थेट शिवीगाळ करून अंगावर हात घातला. पाेलीस ठाण्यातच आराेपींनी शिपायाची काॅॅलर पकडली. इतकेच नव्हे तर त्यांनी ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर मस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आराेपी संताेष जनार्दन जाेगदंड (४१) रा. भांबपखेडा ता. पुसद, सुधाकर भीमराव लाेखंडे (५१) रा. शांतीनगर मुळावा ता. उमरखेड  यांच्याविराेधात पाेलिसांनी कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार हाके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

देशी दारूच्या भट्टीवर वाद घालणाऱ्यावर कारवाई - मुळावा येथील मोहन श्रीराव जयस्वाल यांच्या दारू दुकानावर सुधाकर भीमराव लोखंडे (५१) व चंद्रकांत मोतीराम खडसे (३५) या दोघांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता फुकट दारू दे असे म्हणून वाद घातला होता. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरुन पोफाळी पोलीस ठाण्यात अमोल कान्हेकर याच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई का केली, असे म्हणत आरोपी संतोष जोगदंडे व सुधाकर लोखंडे या दोघांनी पोलीस ठाण्यात जावून थेट पोलीस शिपायावरच हात उचलला. यातील आरोपी संतोष जोगदंडे याला पोफाळी पोलिसांनी अटक केली आहे. सुधाकर लोखंडे हा पसार आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिस