शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक बसस्थानकावर उभारणार पुस्तकांची दालने; लोकवाहिनी करणार मराठीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 15:30 IST

एसटी महामंडळातर्फे मराठी वाचन सप्ताह राबविला जाणार आहे. २७ फेब्रूवारी ते ५ मार्च या कालावधीत अनोख्या पध्दतीने मराठी भाषेचा जागर केला जाणार आहे.

ठळक मुद्देराज्य परिवहन मंडळातर्फे वाचन सप्ताहाचे अनोखे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आजच्या धावपळीच्या जीवन पध्दतीत वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. विविध माध्यमांच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला मराठी भाषेतील अभिजात लेखन संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने एसटी महामंडळातर्फे मराठी वाचन सप्ताह राबविला जाणार आहे. २७ फेब्रूवारी ते ५ मार्च या कालावधीत अनोख्या पध्दतीने मराठी भाषेचा जागर केला जाणार आहे.ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिन २७ फेबु्रवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक बसस्थानकावर वाचन सप्ताह राबविला जाणार आहे. परिवहन व खारभूमी विकासमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे. सप्ताहात बसस्थानकावर पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णन आदी मराठी भाषेतील साहित्य विक्रीची दालने उभारली जाणार आहे. विविध प्रकाशन संस्था, पुस्तक विक्री केंद्राद्वारे प्रवासी, एसटी कर्मचाऱ्याना सवलतीच्या दरात पुस्तक विक्री केली जाणार आहे. पुस्तक विक्रीसाठी या संस्थांना महामंडळातर्फे विनामूल्य मोकळी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.महामंडळामार्फत मागील तीन वर्षांपासून नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाष गौरव दिन साजरा केला जात आहे. यंदा मराठी वाचन सप्ताह या अनोख्या उपक्रमांच्या माध्यमातून पुस्तकाशी मैत्री करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. सप्ताहाच्या निमित्ताने एसटीने दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ७० लाख लोकांना प्रवासवर्णने, विविध लोकनेत्यांचे चरित्र, कथा, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, मौलिक गंथ, विविधांगी लेखन साहित्य उपलब्ध होणार आहे. मातृभाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेतील पुस्तकांचे वाचन वाढावे, यासाठी लोकवाहिनीच्या दैवतालाही साद घातली आहे. प्रत्येक प्रवासी, कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर असलेल्या दालनावरून मराठी भाषेची पुस्तके उपलब्ध करून वाचावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ