शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस खते अन् कीटकनाशकांचा कारखाना सील, ६२ लाखांचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 23:01 IST

कीटकनाशक फवारणीबाधितांची संख्या सव्वाशेवर गेलेली असतानाच यवतमाळच्या कृषी गुणवत्ता नियंत्रण पथकाने नागपूर रोडवरील कळंब येथे मंगळवारी रात्री बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना पकडला

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीबाधितांची संख्या सव्वाशेवर गेलेली असतानाच यवतमाळच्या कृषी गुणवत्ता नियंत्रण पथकाने नागपूर रोडवरील कळंब येथे मंगळवारी रात्री बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना पकडला. या कारखान्याला ६२ लाखांच्या साठ्यासह सील करण्यात आले. याप्रकरणी सचीन अरुण कावळे (२८) याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार चंद्रशेखर गणेश थोटे (३३) रा.कारिया ले-आऊट, कळंब हा फरार आहे. 

याप्रकरणी अटकेतील आरोपींविरुद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७१ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम, कीटकनाशक कायदा, रासायनिक खत नियंत्रण, जीवनावश्यक वस्तू अधिनियममधील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तालुका कृषी अधिकारी संजय पाठक यांनी या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. वेणी कोठा रोडवरील गुरूदेव जिनिंग मिलच्या आवारात सुरू असलेला हा कारखाना नेमका किती वर्षांपासून आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या कारखान्यात बनावट कीटकनाशके व खतांची निर्मिती तसेच विशिष्ट विक्रेत्यांमार्फत पुरवठा-विक्री होत असल्याची टीप कृषी विभागाला मिळाली. त्यावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागनाथ कोळपकर यांच्या नेतृत्वात या कारखान्यावर धाड घालण्यात आली. या धाडीमुळे बोगस कृषी साहित्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर आदी या पथकात सहभागी होते. या कारखान्यातून नेमका कुणाकुणाला पुरवठा झाला, पुरवठादार किती वर्षांपासून कारखान्याच्या कनेक्शनमध्ये आहेत, नेमका कुणाकुणाला हा माल विकला, याचा तपास पोलीस व कृषी विभाग करीत आहे. 

जिल्ह्यात गतवर्षी कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर साडेनऊशेवर शेतकरी-शेतमजूर बाधित झाले होते. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या. मात्र, त्यानंतरही यावर्षी आतापर्यंत फवारणी विषबाधा झालेल्यांची संख्या १२८ वर पोहोचली आहे. या अनधिकृत कारखान्यातून झालेल्या कीटकनाशक पुरवठ्यातून तर विषबाधेचे रुग्ण वाढले नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. हा कारखाना अनेक वर्षांपासून सुरू असेल तर एवढे वर्ष कृषी विभागाची यंत्रणा काय करीत होती, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाYavatmalयवतमाळ