लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, २ जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी ११ वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे. याठिकाणी वृक्षारोपणही केले जाणार आहे. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि लोकमत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे.रक्तदान श्रेष्ठ दान आहे. गरजूंना आवश्यक त्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांची धावपळ होते. प्रसंगी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. ही वेळ येऊ नये यासाठी रक्ताचा साठा आवश्यक आहे. यादृष्टीने सदर रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी विभागाचे या शिबिरासाठी सहकार्य लाभणार आहे.सदर शिबिर शासनाच्या नियम व निकषानुसार आयोजित केले आहे. त्यात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदी आरोग्यविषयक सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाणार आहे.यावेळी उपस्थित राहून रक्तदान करावे, अशी विनंती लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी आदींनी केली आहे. अधिक माहितीसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड (९५११६४८४८८), प्रा. मिलिंद लाभशेटवार (९८८१३१२४००) यांच्याशी संपर्क करता येईल.
जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ंआज रक्तदान शिबिर व वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST
रक्तदान श्रेष्ठ दान आहे. गरजूंना आवश्यक त्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांची धावपळ होते. प्रसंगी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. ही वेळ येऊ नये यासाठी रक्ताचा साठा आवश्यक आहे. यादृष्टीने सदर रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी विभागाचे या शिबिरासाठी सहकार्य लाभणार आहे. सदर शिबिर शासनाच्या नियम व निकषानुसार आयोजित केले आहे.
जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ंआज रक्तदान शिबिर व वृक्षारोपण
ठळक मुद्दे‘जेडीआयईटी’त आयोजन : राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा पुढाकार