लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सफाई कंत्राटदार आणि मालकावर फौजदारी दाखल करण्याच्या मागणीसाठी नगरपरिषद सफाई कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला ४२ दिवस लोटूनही नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर संतापलेल्या कामगारांनी गुरुवारी उपोषणमंडपातच रक्तदान करून रक्ताच्या बॉटल प्रशासनाला निषेध म्हणून सुपुर्द केल्या.३१० सफाई कामगार १९९० पासून शहर स्वच्छतेचे काम करीत आहे. २००२ पर्यंत कामगारांना नगरपरिषद प्रशासनच वेतन देत होते. मस्टरवर तशी नोंद आहे. २००२ नंतर कंत्राटदार, संस्थांना सफाईचे काम देण्यात आले. २०१५ पासून ज्यांना कंत्राट देण्यात आले, त्या कंत्राटदारांच्या शर्ती व अटीनुसार पूर्ण वेळ सफाई काम करणे, किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करणे, कामगार कायद्याप्रमाणे भविष्य निर्वाह भत्ता देणे बंधनकारक आहे. मात्र कोणत्याही कामगाराला किमान वेतन, भविष्य निर्वाह भत्ताही मिळत नाही. त्यामुळे सफाई कंत्राटदार आणि मालकावर फौजदारी दाखल करण्यात यावी, अशी मागणी कामगारांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शेंडे, सचिव किशोर मेश्राम, सल्लागार बाबूलाल चव्हाण, दीपक भेंडे, शेख हसन, संदीप पाटील, दादाराव पजारे, धनंजय गौरखेडे आदी उपस्थित होते.
सफाई कामगारांनी केले शोषणाविरूद्ध रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST
३१० सफाई कामगार १९९० पासून शहर स्वच्छतेचे काम करीत आहे. २००२ पर्यंत कामगारांना नगरपरिषद प्रशासनच वेतन देत होते. मस्टरवर तशी नोंद आहे. २००२ नंतर कंत्राटदार, संस्थांना सफाईचे काम देण्यात आले.
सफाई कामगारांनी केले शोषणाविरूद्ध रक्तदान
ठळक मुद्दे४२ दिवसांपासून उपोषण : पत्रकार परिषदेत प्रशासनावर रोष