जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:00 AM2020-09-22T05:00:00+5:302020-09-22T05:00:31+5:30

यवतमाळ जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. शासकीय रुग्णालयातील खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तर खासगीतही कोरोना रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली जात आहे. यवतमाळातील तीन खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होत आहे. अशातच सध्या रामबाण समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा वापर सर्रास होत आहे.

Black market of remedivir injection in the district | जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार

जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार

Next
ठळक मुद्देदाम दुप्पट : रुग्णाच्या नावाने औषध येत असल्याचा परिणाम

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाने फुफ्फुसाची ऑक्सिजन वहन क्षमता प्रभावित होते. फुफ्फुसावरील कोरोना विषाणू संसर्ग वाढत गेल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. फुफ्फुसातील संसर्ग थांबविण्यासाठी सध्या रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा वापर होत आहे. त्यामुळे त्याला प्रचंड मागणी आहे. याचाच फायदा घेऊन यवतमाळात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. शासकीय रुग्णालयातील खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तर खासगीतही कोरोना रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली जात आहे. यवतमाळातील तीन खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होत आहे. अशातच सध्या रामबाण समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा वापर सर्रास होत आहे. फुफ्फुसाला संसर्ग झाल्यानंतर त्यावर तातडीचा उपचार म्हणून रेमडेसिव्हिर इंजेक्शन वापरले जाते.
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात अचानक रेमडेसिव्हिर या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. उत्पादन मर्यादित असल्याने त्याची टंचाई जाणवत आहे. हे इंजेक्शन कोरोना रुग्णालय चालविणाºया डॉक्टर, कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण यांनाच मिळते. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे.

कोविड रुग्णांची सर्वत्रच लूट
कोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अडचणीसोबतच आर्थिक फटका सोसावा लागत आहे. कोरोनाचा धाक दाखवून मनमानी पद्धतीने पैसे उकळले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिंदे प्लॉटमधील खासगी कोविड रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका चालक चक्क दीड ते दोन हजार रुपये भाडे आकारत आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. नागपूरला उपचारासाठी जायचे असल्यास रुग्णवाहिकेचे भाडे उपचार खर्चाइतकेच आकारले जाते. कोरोना रुग्णांच्या अगतिकतेचा व्यापार केला जात आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्याचा पुरवठा ठोक विक्रेत्यांकडूनच व्हायला हवा. शिवाय खासगी कोविड हॉस्पिटलच्या परिसरातील रिटेलरला विक्रीची परवानगी द्यावी. तरच रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा काळाबाजार थांबणे शक्य आहे.
- पंकज नानवाणी, अध्यक्ष केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन, यवतमाळ.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल व डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन असल्याशिवाय रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाही. तशा सूचना शासन स्तरावरूनच आल्या आहेत. सध्या उत्पादन मर्यादित आहेत. गोव्यात नवीन युनिट सुरू झाल्यानंतर उपलब्धता वाढेल.
- संजय राठोड
औषध निरीक्षक, यवतमाळ .

Web Title: Black market of remedivir injection in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.