शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Video - भाजपा आमदाराच्या दुसऱ्या पत्नीची पहिली विरोधात पोलिसात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 16:30 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरुद्ध मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरुद्ध मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली.तक्रारीमध्ये धिंड काढणे, विनयभंग यासह अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली

यवतमाळयवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरुद्ध मंगळवारी (१२ मार्च) अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. त्यात त्यांनी धिंड काढणे, विनयभंग यासह अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. 

अपर पोलीस अधीक्षकांना तक्रार वजा निवेदन सादर केल्यानंतर आमदाराच्या दुसऱ्या पत्नीने येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांची पत्नी अर्चना येडमे-तोडसाम, पांढरकवडाच्या पंचायत समिती सदस्य शीला गेडाम, मनीष रामगीरवार, गणेश घोडाम, नागोराव गेडाम, अक्षय नवाडे, आकाश उर्फ मोनू कनाके, रुपेश चौधरी, महेंद्र कर्णेवार, रणजित चव्हाण यांच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पांढरकवडा शहरात १२ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे म्हटले आहे. उपरोक्त व्यक्तींनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केला, लाथाबुक्क्यांनी तसेच चपलेने मारहाण केली, त्याची व्हिडीओ चित्रफित बनवून सर्वत्र व्हायरल केली, गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने, मोबाईल जबरीने हिसकावून विनयभंग केला, सार्वजनिकरीत्या धिंड काढली आदी आरोप करण्यात आला आहेत. यासंबंधीची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यातही नोंदविण्यात आली. सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोदींच्या सभेमुळे रोखले

मारहाणीच्या उपरोक्त घटनेची फिर्याद पांढरकवडा पोलिसांत देणार होते, मात्र माझे पती आमदार राजू तोडसाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १६ फेब्रुवारीला सभा असल्याने या सभेनंतर तक्रार देऊ असे सांगितले. त्यामुळे मी गप्प बसली. मात्र नंतर मलाच तक्रार दिल्यास अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेल्याचे आमदाराच्या दुसऱ्या पत्नीने पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :YavatmalयवतमाळBJPभाजपा