शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा सत्तेचा दावा

By admin | Updated: October 29, 2015 02:54 IST

नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शिवसेना, भाजपासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटत आहे.

कळंब नगर पंचायत : नेते म्हणतात, आमचेच सर्वाधिक नगरसेवक येणारगजानन अक्कलवार कळंबकळंब : नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शिवसेना, भाजपासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटत आहे. विशेष म्हणजे या चारही पक्षाने स्वबळावर सत्तेचा दावा ठोकला आहे. मात्र जनता कोणाच्या हाती सत्ता देणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.एकहाती सत्ता मिळेल - आ. उईकेसत्तेचा दावा करताना ‘लोकमत’शी बोलताना भाजपा आमदार डॉ.अशोक उईके म्हणाले, आम्ही एकहाती सत्ता मिळवित आहो. कमीतकमी नऊ नगरसेवकाच्या भरवशावर भाजपाचा झेंडा फडकेल. २० वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनी साधी पिण्याच्या पाण्याचीही समस्या सोडविली नाही. हा प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडविणार आहो. चिंतामणी मंदिराला ‘अ’ दर्जा देण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडला जाईल. कळंबला मॉडेल शहर बनविण्याचा मानस आहे. अतिक्रमणधारकांना पर्याप्त जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. चक्रवती नदीचे खोलीकरण करून ‘शिरपूर पॅटर्न’ बंधारे बांधून शहराची जलपातळी वाढविली जाईल, असे डॉ.उईके म्हणाले.११ जागा मिळणार - वसंत पुरकेमाजी आमदार प्रा.वसंत पुरके म्हणाले, काँग्रेसचा ११ जागांवर विजय निश्चित आहे. आम्हाला कोणाचाही पाठिंबा घेण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता निश्चित आहे. पिण्याचे बारमाही शुध्द पाणी पुरविणे हे आमचे ध्येय आहे. प्रशस्त रस्ते, वाचनालय, शैक्षणिक सुविधांकडे जातीने लक्ष दिले जाईल. चिंतामणी मंदिराचे सौंदर्यीकरण आणि पर्यटन विकास हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अतिक्रमण थांबवून शहर स्वच्छ व सुंदर करण्याकडे लक्ष देण्यात येईल. काँग्रेसकडे सर्वांचा कल होता, म्हणूनच काहींनी बंडखोरी केली. परंतु त्याचा कुठलाही फरक पडणार नाही, असा विश्वास आहे.सर्व जागा जिंकणार - देशमुखराष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी सर्व १७ ही जागांवर विजयाचा दावा केला. पिण्याच्या पाण्याला प्राध्यान्य देण्याचे वचन त्यांनी दिले. शहर स्वच्छ व निटनेटके ठेवण्याठी जनजागृतीला प्राधान्य दिले जाईल. यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊ. अतिक्रमणधारकांचा प्रश्न सोडविण्याकडे जातीने लक्ष घालू. अद्ययावत शैक्षणिक धोरण आखले जाईल. क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लावण्यात येईल. खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येईल. श्री चिंतामणी मंदिर विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रवीण देशमुख म्हणाले.स्वबळाचे प्रयत्न - संतोष ढवळेशिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा पक्ष निरिक्षक संतोष ढवळे म्हणाले, आमच्या सात ते आठ उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. स्वबळावर सत्ता स्थापण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सत्तेत असणाऱ्यांनी कुठलेही प्रश्न सोडविले नाही. शिवसेनेवर जनतेने विश्वास दाखविला, तर आम्ही बोलून नाही तर करून दाखवू. पिण्याच्या पाण्याची समस्या आम्ही निश्चित सोडविणार. रस्ते, नाल्या, गटारं, अस्वच्छता या समस्या तत्काळ निकाली काढल्या जाईल. केंद्र व राज्यात आमची सत्ता आहे. त्यामुळे समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून जनता आम्हाला साथ देत आहे, असे संतोष ढवळे म्हणाले. एकंदरीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी बहुमतावर सत्तेत येण्याविषयी प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने जनता कोणावर विश्वास ठेवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.