लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : 'वंशाला दिवा'च हवाय म्हणून कोवळ्या कळ्यांना गर्भातच कुस्करले गेले. परिणामी मुलींचा जन्मदर घटल्याने समाज मनातून चिंता व्यक्त व्हायला लागली. गर्भलिंगनिदानाचे कायदे कडक करण्यात आले. वंशाच्या दिव्यासोबतच लेकीही प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून जिल्ह्याला यंदा लक्ष्मी पावली असून, हजार मागे मुलींचा जन्मदर ९४४ आहे.
एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत शासकीय व खासगी रुग्णालयात एकूण २१ हजार २९४ मुलांनी जन्म घेतला. यात दहा हजार ९५३ मुलांचा तर दहा हजार ३४१ मुलींचा समावेश आहे. मुलगी नको मुलगाच हवा हा अट्टाहास आता हळूहळू कमी होत चालला आहे. वंशाला दिवा नसला तरी अनेक पालक आता एका मुलीवरच पाळणा थांबवण्याचे थांबवत आहे. मुलगी झाली म्हणून काय झालं, तिलाही शिकवू आणि मोठे करू, असा निश्चय करीत आहेत. शिक्षण, आरोग्य, नाट्य, कला, क्रीडा, संशोधन, सुरक्षा यासह अन्य क्षेत्रातही लेकी उंच भरारी घेऊन आपल्या परिवाराचे नाव उंच करीत आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढत असला तरी मागील नऊ महिन्यात मारेगाव, नेर, आणि झरीजामणी तालुके मात्र, माघारले आहे. प्रत्येक तालुक्यात मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी आरोग्य विभागाने माघारलेल्या तालुक्यात जनजागृती करणे आवश्यक आहे.
'बेटी बचाव, बेटी पढाव'चाही फायदा शासनाने बेटी बचाव, बेटी पढाव'चा नारा दिला. कन्यारत्नांच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या.शिक्षण घेणाऱ्या मुलींना सवलती दिल्या जात आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात कन्यारत्नच बाजी मारत असल्याची उदाहरणे आहेत.
२१ हजार मुला-मुलींचा जन्म एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत २१ हजार २९४ मुलामुलींचा जन्म झाला. यात दहा हजार ९५३ मुले तर १० हजार ३४१ मुलींचा समावेश आहे. यात मुलींच्या जन्मदर हजारामागे ९४४ असा आहे. कळंब, दारव्हा, यवतमाळ, आर्णी, बाभूळगाव, दिग्रस, केळापूर, महागाव, पुसद हे तालुके पुढे आहेत.
आशेचा किरण उगवला, भेदभाव दूर झाला मुली प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत असल्याने प्रत्येकच कुटुंबात आशेचा नवा किरण उगवला आहे. पूर्वी वंशाचा दिवा पुढे जावे, असा अट्टाहास होता. मात्र भेदभाव दूर झाला.
गर्भलिंगनिदानाचे नियम कठोर गर्भलिंगनिदान करून मुलगी असल्यास गर्भपात केला जायचा. यामुळे मुलींचा जन्मदर घटत असल्याने चिंता निर्माण व्हायला लागली. यामुळे शासनाने गर्भलिंगनिदानाचे नियम कठोर केले.
वर्षभरात किती मुलं जन्मली?तालुका मुले मुली एकूणआर्णी ३७० ३४९ ७१९ बाभूळगाव ५६ ५३ १०९दारव्हा ३१२ ३१२ ६२४दिग्रस ६७८ ६३२ १३१०घाटंजी १५८ १३९ २९७कळंब ८७ ९८ १८५केळापूर ४१८ ४१७ ८३५महागाव २८४ २५८ ५४२मारेगाव ९० ६८ १५८नेर १०५ ७८ १८३पुसद १६३७ १६३२ ३२६९राळेगाव १०४ ८२ १८६उमरखेड ७९४ ६९१ १४८५ वणी ६१६ ५५४ ११७०यवतमाळ ५१६९ ४९२७ १०,०९६झरीजामणी ७५ ५१ १२६
कळंब तालुक्यात मुलींचा जन्मदर सर्वाधिकतालुका मुलींचा जन्मदरआर्णी ९४३बाभूळगाव ९४६दारव्हा १०००दिग्रस ९३२घाटंजी ८८०कळंब ११२६केळापूर ९९८महागाव ९०८मारेगाव ७५६नेर ७४३पुसद ९९७राळेगाव ७८८उमरखेड ८७०वणी ८९९यवतमाळ ९५३झरीजामणी ६८०