यवतमाळ : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा जयंती महोत्सव १४ व १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी भिमालपेन देवस्थान येथे आयोजित केला आहे. महोत्सवात १४ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता समाजप्रबोधन व आदिवासी लोकनृत्य, महिला ढेमसा नृत्य सादर होणार आहे. तर १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंतीनिमित्त दुपारी २ वाजता बिरसा सेना व उत्सव समितीतर्फे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार राजू तोडसाम राहतील. प्रमुख वक्ते उत्तमराव गेडाम, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी, आमदार अशोक उईके, मदन येरावार, संदीप बाजोरिया, नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा परिषद सदस्य मंदा गाडेकर, नगरसेवक विठोबा मसराम, गुलाब कुडमेथे, पवनकुमार आत्राम, दिलीप कुडमेथे, अविनाश मसराम, निरंजन मसराम उपस्थित राहणार आहेत. शोभायात्रेत राजेश राजगडकर, संतोष मसराम नेतृत्त्व करणार आहे. शोभायात्रा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे राहतील, तर प्रमुख पाहुणे शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, दशरथ मडावी, सुरेश कन्नाके, जितेंद्र मोघे, बाबाराव मडावी, प्रा. माधव सरकुंडे, बाळकृष्ण गेडाम, प्रमोद घोडाम, दीपक करचाल आदी उपस्थित राहणार आहे. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष किरण कुमरे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बिरसा मुंडा जयंती महोत्सव
By admin | Updated: November 13, 2015 02:17 IST